NEWS PRAHAR ( पुणे ) : दौंड भूमी अभिलेख कार्यालयातील महिला भूमापकर वैशाली घसकटे यांनी एका शेतकऱ्याच्या कामांसाठी 14 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 10 हजार रुपयांची लाच ठरली होती. ही लाच स्वीकारताना त्यांच्या खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी (ता.20) रंगेहाथ पकडले आहे. या प्रकारामुळे दौंड शहरात मोठी खळबळ उडाली आहे
फय्याज शेख असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांच्या जागेचे क पत्रक व त्याचा तक्ता तयार करून देण्याकरिता खाजगी इसम फय्याज शेख यांनी 14 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम स्वीकारताना खाजगी इसम फय्याज शेख याला रंगेहाथ पकडले आहे. सध्या दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.