Newsprahar

‘थापा’चे जाळे – स्पा सेंटरच्या नावाखाली खराडीत सेक्स रॅकेट चालवत असल्याची चर्चा…!

पुणे (सुचिता भोसले) – पुणे हे विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अवैध धंद्याची रेलचेल वाढली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलून देखील पुण्यातील खराडीमध्ये ‘स्पा’चे मोठे रॅकेट खुलेआम थापा नावाचा व्यक्ती चालवत असल्याची चर्चा आहे. एकीकडे मटका, दारू, जुगार, पब सारखे अवैध धंदे अंशतः बंद असताना खराडीमध्ये मात्र ‘स्पा’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांना गुंगारा देत ‘थापा’ नावाचे स्पा सेंटर खुलेआम अवैध(लेक्सस )मसाज पार्लर चालवत आहेत. ‘थापा’ने पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे

पुण्यात ‘थापा’ हा व्यक्ती मसाज पार्लर क्षेत्र चालवण्यात कुख्यात असला तरी आता ‘थापा’ हा पडद्याआडून खराडीत मागिल काही महिन्यांपासून मोठे बस्तान बसविण्यात यशस्वी ठरला आहे. स्वतः कोणत्याही ठिकाणी हजर न राहता हस्तकांकडून पुणे शहरातील खराडीत ‘थापा’ आपले अवैध मसाज पार्लर थाटण्यात व्यस्त आहे. उच्चभ्रू रहिवासी असलेल्या ठिकाणी ‘थापा’चे हस्तक ‘स्पा’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवण्यात पटाईत आहे.

‘थापा ’च्या ऑपरेटिंग पद्धतीने सारेच दंग !

अवैध मसाज पार्लर हे धंदे करत असताना पोलीस रेकॉर्डवर नाव न येऊ देणे हि मोठी शंकेची बाब आहे. ‘थापा’च्या याच ऑपरेटिंग पद्धतीने सारेच दंग झाले आहेत. स्वतः कुठेही सामिल न होता पडद्याआडून हस्तकांमार्फत रॅकेट चालविण्याची किमया ‘थापा’ने सिद्ध करून दाखविली आहे.

पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी ड्रग्स कार्टेल ज्या पद्धतीने उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे तो वाखाडण्या जोगा आहे परंतु ‘स्पा’ कडे दुर्लक्ष होत असल्याने खराडीतील नागरिकांमध्ये चर्चा आहे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्याला पोलीस आयुक्त सुरक्षित ठेवतील अशी सुजाण नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत.या खराडीतील सर्रास चालू असलेल्या मसाज सेंटर चालवनारे चालक व मालक या आस्तपनावर पोलीस काय कार्यवाही करणार याकडे सध्या नागरीकांचे लक्ष लागले आहे.