NEWS PRAHAR ( प्रतिनिधी किरण गिरी ) पुणे : नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैद्य धंदे हे अतिशय वेगाने सुरू झाले आहेत. याचे नेमके कारण म्हणजेच सदर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे आहेत, असे स्थानिक जनतेचे म्हणणे आहे .कारण असे की, नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या खेडेगावांमध्ये व नारायणगाव शहरांमध्ये गांजा विक्री, गुटखा विक्री ,मटका, जुगार ,पत्त्यांचे क्लब ,दारू विक्री, सोरेट असे एक ना अनेक प्रकारचे अवैध धंदे नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बिनदिक्कतपणे सुरू आहेत. त्याबाबत मात्र या पोलीस स्टेशनचे पोलीस गप्प बसले आहे. याचे नेमके कारण तरी काय?
असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. नारायणगाव पोलीस स्टेशन चे अधिकारी कोणाच्या दबावाला तर बळी पडले नाही ना? असा खोचक प्रश्न देखील उपस्थित होत आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी कोणाच्या दबावाला बळी पडले नसतील ,तर ते कारवाई का? करत नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अवैद्य धंद्यांपासून नारायणगाव जनतेची सुटका होणार का? या परिसरातील गुन्हेगारी कमी होणार का? असे एक ना अनेक प्रश्न नारायणगाव व आजूबाजूच्या खेड्यापाडीतील लोक उपस्थित करत आहेत.
नारायणगाव पोलीस स्टेशनचे API महादेव शेलार हे पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून नागरिकांना वाटले होते की आता कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या नारायणगाव पोलीस स्टेशनला मिळाले आहेत. त्यामुळे तरी अवैध धंदेवाल्यांना चाप बसेल व वाढती गुन्हेगारी आटोक्यात येईल परंतु तसे काहीही घडले नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पोलिसांबद्दलचा आदर कमी झाला व API शेलार साहेबांवरील विश्वास धुळीला मिळाला. असे नागरिकांना वाटते. यानंतर तरी शेलार साहेब अवैध धंदे वाल्यांनवर कारवाई करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नारायणगाव व परिसरातील वैद्य धंद्यांची यादी पुढीलप्रमाणे :
१) मच्छी मार्केट – मटका.
२) भुई आळी – गांजा विक्री.
३) जुन्नर रोड व जुन्नर वेशी जवळ – गुटखा विक्री.
४) आर्वी केंद्र फाटा – पत्त्यांचा क्लब व दारूचा धंदा.
५) १४ नंबर- ताडी-विक्री.
६) भोर वाडी – गावठी हातभट्टी दारू विक्री.
७) निमगाव सावा – पत्त्यांचे क्लब , मटका व दारूचा धंदा.
८) खोडद – गुटखा विक्री व दारू विक्री.
९) मांजरवाडी – गुटखा विक्री व दारू विक्री.
~नारायणगाव व परीसरातील सुरु असलेले अवैध धंदे सुरु ठेवणार की, यावर कारवाई करणार किंवा यापैकी कोणते धोरण अवलंबणार…