Newsprahar

गुन्हेगारांना हाताशी धरून पुण्याच्या गुरुजींचे शिष्यच करतात अदृश्य पद्धतीने माया गोळा….

NEWS PRAHAR ( पुणे )  :वैध मटका,गांजा ,जुगार व हुक्का पार्लर हे अवैद्य व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त साहेब सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.यापूर्वी ठोस पावले उचलून मटका-जुगार व गांजा मालकांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिस प्रशासनाला नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पत्यांचा क्लब बंद करण्यात अपयश येत असल्याने नागरीक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदा क्लब,गांजा,मटका,हुक्का पार्लर अशा ऐक ना अनेक व्यावसायिकांचे प्रमाण फोफावत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः क्लब माफिया दोन महिन्यांपासुन स्वतंत्रपणे क्लब चालवत असल्याचे लोकचर्चेतून समजत आहे.

त्याच बरोबर वाघोली पोलीस स्टेशनवर पोलीस आयुक्तांचे लक्ष कमी झाल्याने तेथील अदृश्य कलेक्टरने मोकळा श्वास घेतला आहे. त्याचा परिणाम वाढती गुन्हेगारी, नाईट पत्त्यांचा कल्ब, गांजा ,दारू विक्री याला मोकळीक दिली की काय ? त्याच बरोबर गुटख्याचे सर्वाधिक मोठे होलसेल विक्रेते याच भागात आहेत. थोडक्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून थेट पत्यांचा क्लब,गांजा,दारू,हुक्का पार्लर व गुटख्यासहित अंमली पदार्थांची विक्री होताना दिसत आहे. 

 

क्लब च्या माध्यमातून दरदिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याच भागात नाईट पत्त्यांच्या क्लब मुळे गुन्हेगारी वाढत आहे. वेळोवेळी स्थानिक नागरिक तक्रारी देऊन देखील वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस कारवाईच्या नावाखाली दिखाऊपणा करत आहेत. वाघोली पोलिस स्टेशन परिसरात गुन्हेगारी टोळ्या देखील सर्वाधिक आहेत.

याच परिसरात शिवकृपा वजन काटा शिवगंगा वॉशिंग सेंटर लोहगाव रोड वॉशिंग सेंटरच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात 50 ते 60 लोक जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून न्युज प्रहारला देण्यात आली. तसेच दिवस रात्र पत्यांचा क्लबला येथील नागरी चांगलेच वैतागले आहेत अनेक तक्रारी करून देखील कारवाई मात्र शुन्य ?

क्लब माफीया कमी वेळात झटपट श्रीमंत होण्याच्या नादात लालची प्रवृत्तीचे लोक या क्लब व्यवसायाच्या मागे लागलेले असून आज पर्यंत हे क्लब किंग लाखो करोडो ने श्रीमंत होत आहेत. टेबलचे प्रकार (२५+५०) (५०+१००)(१००+२००)अशा प्रकारे टेबल लावून लोकांना व्यसनाच्या दरीत ढकलत आहेत.

क्लब माफियांचा व्यवसाय सुरळीत चालावा म्हणून स्थानिक यंत्रणेचे अदृश्य कलेक्टर “अर्थपूर्ण” पद्धतीने सोबत घेऊन चालत असल्यानेच वाघोली पोलिस स्टेशन परीसरात क्लब व्यवसाय तेजीने व बेधडक सुरु असल्याचे लोकांमध्ये खुलेआम चर्चिले जात आहे.तर नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली पोलीस स्टेशनकडून यावर अंकुश लावण्यात येईल की नाही? हा देखील एकदम गंभीर प्रश्न आहे. या बाबत नागरीकांना शंका आहे.

कलेक्टर करताहेत दरमहा लाखोंची वसुली…

क्लब व्यावसायिकांना वाघोली पोलीस स्टेशनचे कलेक्टर, गुन्हे अन्वेषण विभाग किंवा इतर विशेष पथकाचा छापा पडणार नाही याची खात्री असल्याने वाघोली परिसरात संगनमताने अवैध पत्यांचा क्लब व्यवसायिकांनी चांगलाच जम बसवला आहे. रोज लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायाने वाघोली पोलिसांना हाताशी घेऊन व्यावसायिकांनी देवाण घेवाण वाढवून आपली वेगळ्या प्रकारची छाप बनवली आहे.

 क्लब व्यावसायिकांना प्रशासनाची कोणतीच भीती राहिली नसून वाघोली येथील मोठ्या प्रमाणात जुगार चालवणारा गॅम्बलर आप्पा अनेक वर्षापासून २ नंबर धंदा करीत आहे . हा अवैध धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने करत असल्यामुळे त्याने दहशत निर्माण करून या परिसरातील नागरिकांवर स्तोम माजवले आहे . नागरिक काही बोलले तर तो काय म्हणतो पोलीस माझ्या पाठीशी आहेत माझं कोण काय करत नाही ह्या दोन जुगार लाईन मध्ये त्याच्यावरती आतापर्यंत सात ते आठ गुन्हे दाखल आहेत तरी त्याच्यावर तडीपारची कारवाई होताना दिसत नाही ,पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन यावर योग्य ती कठोर कारवाई करावी असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे..