Newsprahar

गुटखा फेरीवाल्यांचा हडपसर परिसरात सुळसुळाट…!

NEWS PRAHAR सुचिता भोसले  ( पुणे ) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांना ‘फुल स्टॉप’ लावल्यानंतरही हडपसर भागात (अमर सोळुंखे) हा व्यक्ती भेकराईनगर,फुरसुंगी,पावर हाऊस,पापडे वस्ती,मंतरवाडी या सर्व परीसरामध्ये गुटखा खुलेआम विक्री करत असल्याने गुटख्याला कोणाचे अभय लाभले आहे का ? याबाब हडपसर परीसरात नागरीकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

बंदी असूनही हडपसर भागात सर्वत्र गुटखा, मावा ,RMD ,रजनी गंधा यासारखे नशा येणारे पदार्थ सर्रास पान टपरीमध्ये मिळत आहेत. पानटपरी, छोटे चहाचे स्टॉल्स व जनरल स्टोअर्स यांच्यासोबत आता किराणा दुकानातही गुटखा उपलब्ध होत आहे. यामुळे हडपसर परिसरातील गुटखा बंदी कागदावरच असल्यामुळे बेकायदा गुटखाविक्री जोमात सुरू आहे.

अशा पद्धतीने सध्या हडपसर मध्ये फेरीवाले गुटखा विक्री करत आहेत :

पुणे शहर अंतर्गत अवैध धंद्यांचे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कडक उपाय योजना राबविल्या. यात महत्वाचे म्हणजे हद्दीतील वसुली बहाद्दरांची यादी तयार करून त्यांना अल्टिमेटम देण्यात आला. यातील बोर्डावरील 44 जणांना प्रशिक्षण देखील देण्यात आले. असे असताना देखील गुटखा विक्रेते खुलेआम विक्री करत आहेत. यापाठीमागे कोण आहे याबाबत हडपसमधील नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.

शासनाचे पुणे पोलिस आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत का? कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे गुटखाविक्री जोरात सुरू आहे.
हडपसर पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे का? गुटखा ठराविक दुकानदारांकडे पाठविला जातो. तेथून संबंधित रिटेलर खरेदीदार घेऊन जातो. गुटख्याच्या एका पुडीची किंमत १५ ते २० रुपये आहे.

गुटख्यास बंदी असल्यामुळे कोणीही दराचा विचार करीत नाही. मिळेल त्या किमतीने गुटखा खरेदी केला जात आहे. हडपसर भागातील खरेदीदारांना फेरीवाले गुटखा पुरवतात. महिन्याचा गुटक्याचा साठा करून ठेवलेला असतो आणि नंतर ते  फेरीवाले स्वत्ताच्या दुचाकी ने गुटखा पुरवत आहेत. अनधिकृत टपऱ्या, छोटे स्टॉल्स आणि पत्र्याचे तात्पुरते उभारलेले शेड यांमधूनही गुटकाविक्री केली जाते. 

अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांकडूनही तात्पुरती जुजबी कारवाई केली जाते. आणि अवैध विनापरवानगी बांधकामांवर महानगरपालिका कारवाईच करीत नाही. यामुळे गुटखा व मावा हा व्यवसाय अनाधिकृत दुकाने टपऱ्या मध्ये हडपसर परिसरात सर्रास सुरु आहे.