NEWS PRAHAR : गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (12 जून) दुपारी एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघाताच्यावेळी विमानामध्ये तब्बल 242 प्रवासी होते. त्यामुळे या दुर्घटनेत खूप मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानीनगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला.एअर इंडियाचं सदर विमान ज्या इमारतीवर कोसळलं, ती रुग्णालयाची इमारत होती. त्यामुळे रुग्णालयाचं देखील मोठं नुकसाना झालं आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात देखील जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र 242 प्रवाशी आणि 12 क्रु विमानात होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.