Newsprahar

कोंढवा कडनगर येथील मटका अड्डयावर व. पो. निरीक्षक संतोष सोनवणे यांची धडक कारवाई; नागरिकांनी केले अभिनंदन…

NEWS PRAHAR ( प्रतिनिधी- राहूल हरपळे )  : एन. आय. बी. एम रोडवर कडनगर येथे पेट्रोल पंपासमोर फिश मार्केटच्या मागे मागील अनेक दिवसांपासून मटका जुगार अड्डा जोरात सुरु होता, या अड्डयावर स्थानिक नागरिक,मजूर यांची वर्दळ होती.गोरगरीब नागरिकांना मटका- जुगाराचा नाद लावून नाद लावून मटका व्यावसायिक चांगलीच कमाई करत होता तेव्हा त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी याबाबत आवाज उठवल्यावर कोंढवा पोलीस स्टेशनचे दबंग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणेसाहेब यांनी धडक कारवाई करत हा मटका जुगाराचा अड्डा उध्वस्त केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणेसाहेब मार्गदर्शनाखाली यांच्या सहा पोलीस निरीक्षक सुकेशनी जाधव मॅडम, पो- लीस शिपाई निलेश कामथे यांनी धडक कारवाई केली आणि मटका अड्डा चालक सूर्यकांत भोंगळे ( वय ४५ रा तरवडे वस्ती) यास मटका साहित्य, रोख रक्कम जप्त करीत अटक केली.

याठिकाणी मिलन डे मटका जुगारसाठी सूर्यकांत सापडला. भोंगळे हा जुगार खेळणारंकडून चिट्ट्या घेताना कोंढवा पोलिसांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी मटका कडनगर येथील मच्छी मार्केट पाठीमागील मटका अड्डा उध्वस्त केल्याने महंमदवाडी, कडनगर, एन. आय. बि.एम रोड परिसरातील नागरिकांनी सोनवणे साहेबांचे अभिनंदन केले आहे.