Newsprahar

अमिताभ बच्चन यांनी केले “एका रात्रीची बाई” चे पोस्टर ट्विट.

NEWS PRAHAR : नुकतंच एका मराठी सिनेमाच्या शिर्षकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे व त्याचे कारण आहे भारतीय चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन.

आश्चर्य वाटलं ना? भारतीय चित्रपटसृष्टीच्या या महानायकाने त्याच्या एक्स अकाउंटवरून एका मराठी चित्रपटाचे थेट पोस्टर टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या तर त्याचं आश्चर्य तर वाटणारच ना! बरं चित्रपटाचं नाव सुद्धा उत्सुकता वाढवणारं “एका रात्रीची बाई“. परंतु आजच्या परिस्थितीत, की ज्यावेळी कलकत्ता, बदलापूर, दिल्ली यासारख्या शहरांमधील घटनांच्या बातम्यांनी वृत्तपत्र भरलेले असते, त्यावेळी अशा शिर्षकाच्या मराठी चित्रपटाचे पोस्टर थेट अमिताभ बच्चन यांनी ट्विट केल्याने प्रेक्षकांच्या नजरा वेधल्या आहेत.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या व्हिस्टलिंग वूड्स इंटरनॅशनल येथील आपले शिक्षण पूर्ण केल्यावर संकलक – दिग्दर्शक ओंकार निलंगे या तरुणाने त्याच संस्थेच्या सहाय्याने या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटाबद्दल अधिक माहिती जाणून घेत असताना हा चित्रपट प्रसिद्ध लेखक श्री. राजन खान यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित असल्याचे समजले. त्याचप्रमाणे चित्रपटास सेन्सॉर बोर्डने देखील Unrestricted (अमर्यादित) प्रमाणपत्र देऊन सर्व वयोगटातील प्रेक्षकांना चित्रपटगृहाची दारं उघडी करून दिली आहेत. लवकरच चित्रपट प्रदर्शनाची तारीख प्रसिद्ध करणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगितले जात आहे.