NEWS PRAHAR ( फुरसुंगी ) : दि : ५ ऑक्टोबर : शिवशंभू सोशल फाउंडेशन या संस्थेने फुरसुंगी गावच्या गायरान टेकडी व परिसरात मागील चार-पाच वर्षात एक लाख प्रकारचे विविध झाडे लावली व त्या झाडांचे संगोपन सुद्धा केले. हे करत असताना झाडांना वेळेवर पाणी मिळावे म्हणून तीस लाख लिटरचे शेततळे या संस्थेच्या माध्यमातून उभा करण्यात आले त्यातून ठिबक सिंचनाद्वारे झाडांना पाणी दिले जाते.
यामुळे या परिसरात गर्द झाडी हिरवळ डोंगर निर्माण झाला. या कार्याची दखल घेत 2 ऑक्टोबर 2025 गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त या संस्थेला फुरसुंगी देवाची उरुळी नगरपरिषदेने विशेष असे सन्मानपत्र देऊन संस्थेचा गौरव केला. या कार्यक्रमासाठी फुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शिंगटे साहेब तसेच श्री.मेमाणे साहेब उपस्थित होते. यांनी देखील यावेळी या टेकडीवरती वृक्षारोपण केले. तसेच या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक देखील केले व त्यांना पुढील कामास शुभेच्छा दिल्या.
