Newsprahar

फुरसुंगीकरांचा संताप : कर भरतो तरी सुविधा कुठे? रस्त्यांची दुरवस्था, नागरिक त्रस्त….

NEWS PRAHAR (HADAPSARदि : ३० ऑक्टोबर : फुरसुंगी गावात जाणारा मेन रोड हरपळे वस्ती ह्या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. यामुळे या भागातील रहिवाशांना येता- जाताना कसरत करावी लागत आहे. याबाबत महापालिका प्रशासनातील अधिकार्‍यांशी वारंवार संपर्क करूनदेखील कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे फुरसुंगी परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही कर कोणत्या सुविधांसाठी प्रशासनाकडे भरतो, हेच कळत नाही,’ असे मत फुरसुंगीतील रहिवाशी व्यक्त करत आहेत.

कर हा सर्वांकडून घेतला जातो. परंतु, सोयीसुविधांपासून नगरपालिका हद्दीतील नागरिक वंचित राहत आहेत, याची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.