NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. तिघांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती येत आहे.शहरातील डीपी रोडवर गोळीबार झाल्याची माहिती आहे. ‘साम टीव्ही’ने हे वृत्त दिले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
ऐन दिवाळीमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना अलंकार पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. शहरातल्या गजबजलेल्या परिसरात गोळीबार झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आहेत.