NEWS PRAHAR ( पुणे ) : दि : ७ ऑक्टोबर : गणेशोत्सव हा पुणे शहरातील सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सण आहे. नुकतेच राज्य शासनाने गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतर्फे पीएमसी केअर अॅपच्या माध्यमातून पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचा उद्देश सामाजिक ऐक्य साधणे, पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करणे तसेच नागरिकांचा सक्रीय सहभाग वाढविणे हा होता. ही स्पर्धा केवळ एक सजावट स्पर्धा नसून “उत्सव, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम” साधणारा उपक्रम म्हणून राबविण्यात आला. स्पर्धेचा कालावधी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ असा होता. सदर स्पर्धेसाठी भरगोस असा १४०० हुन अधिक सजावटींचा सहभाग आला होता.
पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – रोहन सचिन मोहोळ, द्वितीय क्रमांक – निलेश दिनकर पगारे, तृतीय क्रमांक– हर्ष संतोष टिळेकर, उत्तेजनार्थ – अनिकेत नंदकुमार मोरे, अतुल भाऊसाहेब दांडेकर, रसिक रविंद्र कोंधळकर, समिक्षा योगेश गुजर, प्रदीप उत्तमराव दीक्षित, सचिन रमाकांत शिंदे, शिल्पा प्रथमेश डांगे यांनी यश संपादन केले. सदर स्पर्धेमध्ये भारती विद्यापीठ, पुणे येथील ललित कला विभागाचे प्राध्यापक मा. डॉ. श्री. गिरीश चरवड, पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण शिक्षण अधिकारी मा. श्रीमती अश्विनी यादव, पर्यावरण समन्वयक मा. श्रीमती अमिता देवकते यांनी परीक्षण केले.
प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु.७५०००/-, रु.५०,०००/- व रु.२५,०००/- अशी तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना रु. २००० अशी रोख पारितोषिके देण्यात आली. निवडक सजावटी महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. पुणे महापालिका आणि पीएमसी केअर यांच्या या विधायक उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
ज्येष्ठ कवी श्री रामदास फुटणे व राजेश कामठे, प्रशासन अधिकारी, सांस्कृतिक विभाग, पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांक :
द्वितीय क्रमांक :

तृतीय क्रमांक :

