NEWS PRAHAR ( PUNE ) दि : २० ऑक्टोबर : काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमधील लावण्य हॉटेल जवळील ब्रिजचे खाली नाल्यामध्ये अवैध हातभट्टी दारू विक्री करणारी महिला नामे सौ.रेखा विजय काळकर ,वय ५० वर्षे राहणार तरवडे वस्ती , मोहम्मद वाडी पुणे हिस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतलेले असून सदर ठिकाणी अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शेड हे उध्वस्त करण्यात आले असून पुढील कार्यवाही करता सदर महिलेस काळेपडळ पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलेले आहे. सदर बाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज सुरू आहे.
त्याचप्रमाणे सदर भागात काळेपडळ पोलीस स्टेशन कडील सीआर मोबाईल व मार्शल तसेच तपास पथक यांना अधिक पेट्रोलिंग करून पुन्हा काही प्रकार आढळून आल्यास सदर बाबत योग्य ती कारवाई करणे बाबत सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिल्या आहेत. या कारवाई मुळे स्थानिक नागरिकांनी वरिष्ठ अधिकारी यांचे आभार मानले.