NEWS PRAHAR : पंजाबमधील फिरोजपूर येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बुधवारी दुपारी सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान चुकून सीमा ओलांडल्याने पाकिस्तान रेंजर्सने त्याला ताब्यात घेतले. हा जवान स्थानिक शेतकऱ्यांना कुंपणाजवळ सुरक्षा पुरवत असताना हा प्रकार घडला, अशी माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली.
या जवानाच्या लवकर सुटका व्हावी यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर ध्वज बैठक (प्लॅग मीटिंग) सुरू आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत आता चुकून पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केलेल्या एका बीएसएफ जवानाला पाकिस्तान रेंजर्संनी ताब्यात घेतले