Newsprahar

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती पदी मंगेश जगताप यांची वर्णी लागण्याची शक्यता…

NEWS PRAHAR ( पुणे )  दि : १७ मार्च : पणदरे सांगवी या जिल्हा परिषदेच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मंगेश प्रतापराव जगताप यांना पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती पद मिळावे अशी मागणी युवा वर्गाने केली आहे.नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पणदरे सांगवी या जिल्हा परिषदेच्या गटातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंगेश प्रतापराव जगताप यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे. मंगेश जगताप यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे.

त्यांनी यापूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून काम केले आहे. त्याचे वडील कै. प्रतापराव जगताप यांचे फार मोठं वलय पणदरे परिसरात आहे. मंगेश जगताप यांना स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे काम केल्याचा अनुभव पाठीशी आहे. एक सक्षम युवा नेतृत्व म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते. अशा नेतृत्वाला बांधकाम सभापती म्हणून संधी दिली तर ते आपल्या कामातुन कर्तृत्वाची छाप पाडू शकतात. त्यांचेकडे विकासाचे व्हिजन व दुरदृष्टी आहे. स्व. अजित पवार यांचे आदर्श कार्य पुढे चालवण्यासाठी अशा युवा नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे.

या सर्व बाबींचा विचार करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगेश जगताप यांच्यावर विश्वास दाखवत नेतृत्व करण्याची संधी देऊन बांधकाम सभापती पद द्यावे अशी मागणी युवा वर्गाने केली आहे.

बारामती प्रतिनिधी – संदिप आढाव.