NEWS PRAHAR ( पुणे ) : उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दुधाच्या टँकरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. शिंदवणे घाटात गुरुवारी (ता. 16) सायंकाळी सहा वाजायच्या सुमारास हि घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा दुधाचा टँकर हा सोनाई दुध परिवार यांचा असल्याची माहिती मिळाली असून या ठिकाणी उरुळी कांचन येथील कस्तुरी रुग्णवाहिका, कदम रुग्णवाहिका दाखल झाल्या असून पुढील कार्यवाही सुरु आहे.