Newsprahar

BIG BREAKING ; अखेर सतिश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ;मामीनेच काढला मामांचा काटा…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आलीय. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली.

सोमवारी सकाळी सतिश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आले आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी दिली होती . पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पुण्यातील मांजरी परिससरात ९ डिसेंबरला पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिकरणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. पण हत्येचे नेमकं कारण समोर आले नव्हते. अखेर दीड महिन्यानंतर हत्येचे खरे कारण समोर आले असून प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याच उघड झाले. सतिश वाघ यांच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे.

सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली होती. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे सर्व कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं होते. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली.