NEWS PRAHAR ( पुणे ) : हुतात्मा राजगुरू तयाकवांदो न्यू स्पोर्ट मार्शल आर्ट तयाकवांदो/कराटे नॅशनल लेवल आयोजित स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळणवाडी शाळेतील इयत्ता ३री चा विध्यार्थी कु. महमद अकबर चांदली सय्यद व इयत्ता ४ थी चा विध्यार्थी कु. जय नितीन अडसरे दोन्हीही विध्यार्थ्यांना कुमिती व काता ह्या ईव्हेन्ट मध्ये द्वितीय क्रमांकाचे यश मिळवून यश संपादन केले आहे.
त्यांच्या यशामाघे त्यांचे शालेय मार्गदर्शक शिक्षक वृंद -श्री. मनोहर वयकर सर मुख्याध्यापक व उप-शिक्षक श्री. शांताराम डोंगरे सर तसेच कराटे प्रशिक्षक-श्री. गणेश गुळवे सर व सौ. कविता गुळवे मॅडम यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे समस्त ग्रामस्थ वळणवाडी यांच्याकडून कौतुक होत आहे. व सदर विध्यार्थी यांची इंटरनॅशनल कराटे चॅम्पीयन शिप गोवा येथे त्यांची निवड करण्यात आली असल्याचे श्री. गुळवे सर यांनी यावेळी न्यूज प्रहारी शी बोलताना सांगितले.