NEWS PRAHAR ( पुणे प्रतिनिधी- राहूल हरपळे ) : ससून हॉस्पिटलेच डॉक्टर बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडून देतात अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दखल घेतली आहे. या घटनांवरून बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार ससून रुग्णालयात सुरू आहे अशी माहिती गायकवाड यांना मिळाली. हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश गायकवाड यांच्यासोबत ससून रुग्णालय बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली. त्यानुसार काल (सोमवारी) पहाटे दीड वाजता रितेश गायकवाड रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते.
त्यावेळी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रिक्षावाला असल्याचे समजून एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का अशी चौकशी केली. कुठे सोडायचे अशी विचारल्यावर ‘इथून लांब नेऊन सोड, पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे अशा ठिकाणी सोडायला सांगितले.
त्यांनी ‘नेमके कुठे सोडू? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत’ असे विचारल्यावर डॉक्टरांनी तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो असे डॉक्टरानी सांगितले. काही वेळाने डॉक्टरानी सांगितल्यानुसार नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात बसवला. त्या रुग्णाला घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले.
अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले. काही वेळाने रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली व दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाला पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच येरवडा पोलिस ठाण्यात याबाबततक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता या डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या डॉक्टरला हॉस्पिटलमधून निलंबीत करण्यात आले आहे. डॉ.आदिकुमार असे या डॉक्टरचे नाव आहे. हा डॉक्टर बेवारस रुग्णांना निर्जन ठिकाणी सोडत होता. यासाठी एक रिक्षावालाही ठरवलेला होता जो हे काम ५०० रुपयांत करायचा. आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूसनचे डीनची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच या डॉक्टरला निलंबीत करण्यात आले.