NEWS PRAHAR ( पुणे ) – वानवडी परीसरातील हारको कंपनीमध्ये दरोडा टाकणाऱ्या टोळीला पथक २ हडपसर गुन्हे शाखा पोलिसांनी केली अटक पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर येथे नेमणुकीस असलेले अशोक आटोळे, सहाय्यक पोलीस फौजदार यांना त्यांच्या खास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हडपसर इडेस्ट्रीयल एरीआ, हडपसर, पुणे येथील हारको ट्रान्सफॉर्मस या कंपनीतुन दोन वेळा तांब्याच्या पट्या चोरी करणाऱ्या इसमांपैकी त्याचे तोंड ओळखीचा इसम अब्दुल साह रा. चिखली, पुणे सध्या रा. नारायणगांव, पुणे हा त्याचे साथीदारां सोबत पुन्हा हडपसर इंडेस्ट्रीयल एरीआ मधील दुसऱ्या कंपनीमध्ये चोरी करण्याचे उद्देशाने पाहणी करणेकरीता आलेला आहे.
अशी खात्रीशिर बातमी अशोक आटोळे यांना मिळाल्याने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हडपसर इडेस्ट्रीयल एरिआमध्ये मिळालेल्या बातमीप्रमाणे हे व्यक्ती नामे पुढील प्रमाणे :
1) अब्दुल कलाम रहेमान साह, (24 वर्षे) जि. पुणे मुळगाव मु.पो. कळजा, ता. बेलवाह, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश
2) प्रेमसागर सुमीरन कनोजिया, वय (19 वर्षे), रा.कुदळवाडी, चिखली, पुणे मुळगाव रेहाराअर्फा, मेसाही, ता. इटवा, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेवश
3) शकील अहमद मन्सुरी, (24 वर्षे) रा.साकीनाका, मुंबई मुळगाव मु. खैरा, पोस्ट ढोसळ ता. भानपुर, जि. बस्ती, उत्तरप्रदेश
4) रिजवान ऊर्फ अहमद रामुल्ला खान, (19 वर्षे) मुळगांव मु. धुनिया, पोस्ट बडनी, ता. शौहरतगढ़, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश
5) सोमनाथ गणपत कोडीतकर, (38 वर्षे), रा.कात्रज, पुणे मुळगाव मु.पो. हिरपुडी, ता. वेल्हा, जि. पुणे
6) अनिल अनंता रेणुसे, (34 वर्षे), रा.आंबेगाव, पुणे मुळगाव मु.पो. पाबे, रामवाडी, ता. वेल्हा जि. पुणे
यांना ताब्यात घेण्यात आलेले असुन, सदर ताब्यात घेतलेले इसम हे घटनास्थळी असलेल्या सी. सी. टी. व्ही. फुटेजमधीलच असल्याची खात्री झालेली आहे. सदर आरोपी यांचेकडुन चोरी केलेल्या तांब्याच्या दोन पट्या, व गुन्ह्यात वापरलेला एक टेम्पो, एक दुचाकी गाडी, तसेच एक पक्कड वजा कटर, असा एकुण 3 लाख 90 हजार 200रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वरील आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
1) वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा भा.द.वि. कलम 457,380
2) वानवडी पोलीस स्टेशन भा.द.वि. कलम 395 प्रमाणे.
पोलीस पथक :
पोलीस आयुक्त अमितेश कुमार , सह पोलीस आयुक्त प्रविण पवार,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, ज्ञानदेव गिरमकर, सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, शिरीष गोसावी, अमोल सरतापे, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.