Newsprahar

विहिरीत पडलेल्या रानडुक्कर या वन्यप्राण्याला मिळाले जीवदान…

NEWS PRAHAR ( प्रतिनिधी ) : वाघोशी गावाजवळील पिराचीवाडी, ता. फलटण या गावतील उत्तम जाधव या शेतकर्‍याच्या विहिरीमध्ये पाण्याच्या शोधात पडलेल्या रानडुक्कर या वन्यप्राण्याला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढून निसर्गात मुक्त करण्यात आले.

हे कार्य वनविभाग, फलटण व चे सदस्य गणेश धुमाळ, ऋषीकेश शिंदे, शुभम जाधव, शुभम फडके, अतुल जाधव आणि बोधीसगर निकाळजे यांनी पार पाडले.

वनविभाग, फलटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सचिन रगतवान, वनपाल श्री. राजेंद्र आवारे, वनरक्षक बी. आर. भोये मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. तसेच या कामात वनसेवक सुभाष जाधव व गजाबा जाधव यांनीही योगदान दिले.