Newsprahar

वाहनचोराकडून २ होंन्डा अॅक्टीवा व होंडा सी. डी. डिलिक्स अशा एकूण ०३ मोटार सायकल जप्त…खडक पोलीस स्टेशनची कामगिरी..

न्यूज प्रहार ( पुणे ) : सदर बाबत अधिक माहिती अशी की, खडक पोलीस स्टेशन चे हद्दीत वाढते वाहन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीकोनातुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक श्री संपतराव राऊत यांनी खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री प्रल्हाद डोंगळे व तपास पथकातील स्टाफ पोहवा २८४२ दुडम, पोहवा ९१५ ठवरे, पो.हवा. ६८५१ तळेकर, पोशि ८९४८ चव्हाण, पोशि ९१०२ वाबळे, पोशि ८९३८ ढावरे, पो.शि. ३१८५ कुडले असे खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार किरण ठवरे व पोलीस अंमलदार हर्षल दुडम यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली.

साधारण दहा ते पंधरा दिवसापुर्वी ५४ बी. पी. लोहियानगर पुणे येथुन हिरो होंडा सी.डि. डिलक्स MH 12 HR 2709 हि गाडी चोरणारा इसम हा सुशिल लॉज गल्लीमधील रोडवर माडीवाली कॉलनीजवळ पुणे येथे थांबला असुन सदरचा इसम हा अंगाने मध्यम बांधा. रंगाने गोरा, अंगात काळया रंगाचा शर्ट, निळया रंगाची पॅन्ट असे कपडे परिधान केलेले” अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने आम्ही सदरची बातमी लागलीच.

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन यांना कळविली असता, त्यांनी सदरच्या इसमास ताब्यात घेणेबाबत मौखीक आदेश दिल्याने लागलीच आम्ही स्वतः व तपास पथकातील वरील नमुद पोलीस स्टाफ असे खाजगी वाहनाने सदर ठिकाणी जावुन प्राप्त वर्णनाप्रमाणे इसम व हिरो होंडा सी.डि. डिलक्स MH 12 HR 2709 गाडी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता मोबीन सुलतान खान, वय-२७ वर्षे, धंदा-भंगार विक्री. रा. गल्ली नं. ३ घर नं.५ पीएमसी कॉलनी किनारा हॉटेलजवळ दापोडी पुणे असे असल्याचे सांगितले.

त्याचे ताब्यातील हिरो होंडा सी. डि. डिलक्स MH 12 HR 2709 गाडीचे मालकाबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता तो गाडीचे मालकाबाबत विसंगत माहीती देऊ लागल्याने आम्ही त्यास विश्वासात घेवुन त्याचे ताब्यातील गाडीबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, पंधरा दिवसापुर्वी सदरची गाडी हि त्याने ५४ बी.पी. लोहीयानगर पुणे येथुन चोरली असल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हामध्ये अटक करुन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक यांनी तपास पथकाचे सहाय्याने अधिक तपास करता त्यांच्याकडून चोरीच्या ५२,०००/- रुपये किंमतीच्या ०३ मोटारसायकल जप्त केल्या असून ०३ गुन्हे उघडकीस आले आहे.

नमुद कारवाई श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. प्रविण पवार पोलीस सह आयुक्त श्री. प्रविण
पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व श्रीमती रुक्मिणी गलांडे, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्री रविंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राउत पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, लखन ढावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, नितीन जाधव, तुळशीराम टेभुर्णे, महेश जाधव, यांचे पथकाने केली आहे.