Newsprahar

रिक्षा चालकाचा प्रमाणीकपणा ? प्रवासा दरम्यान मिळालेली लॅपटॉप बॅग मुंढवा पोलीस ठाण्यात केली जमा…

रिक्षा चालक यांचे चांगले कामाचे कौतुक…

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी केला सत्कार….

न्यूज प्रहार ( पुणे ) :पुणे शहरात रिक्षा चालवून आपला व कुटूंबियाचा उदरनिर्वाह करणारे श्री. राजेश चंद्रकांत संघावार, वय ५६ वर्षे, रा. शिंपी आळी, कॅम्प, पुणे हे मुंढवा पोलीस ठाणे परिसरामध्ये रिक्षा व्यवसाय करीत असतांना एका ग्राहकांची लॅपटॉप बॅग मिळुन आली. सदर बॅगमध्ये लिनीओ कंपनीचा अंदाजे ७०,०००/- ( सत्तर हजार रुपये किंमतीचा) व इतर महत्त्वाचे कागदपत्र मिळुन आले.

महागड्या लॅपटॉपचा कोणताही लोभ न करता, आर्थिक आपेक्षा न धरता सदर बॅगमधील कागदपत्राची व इतर वस्तुंची पाहणी करुन कोणता संपर्क होवून माहिती मिळते काय याबाबत खात्री केली परंतू काहीएक उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही.

सदरचा लॅपटॉप बॅगमध्ये पासवर्ड लिहुन ठेवलेल्या मिळाल्याने सदर पासवर्डच्या मदतीने लॅपटॉप लॉक खोलून लॅपटॉपचे जी-मेल वरुन ई-मेल आयडी प्राप्त केला व त्यावर लॅपटॉप बॅग मिळुन आली असल्याचा संदेश दिला, सदरचा संदेश लॅपटॉप मालक श्री. सुरज हेमराजनी यांना प्राप्त झाल्याने व कामाचे निमित्त बाहेर असल्याने त्यांनी त्यांचे प्रतिनिधी श्री. शेखर हीरवे यांना पाठवून दिले. सदर व्यक्ती लॅपटॉपचा मुळ मालक नसल्याने योग्य खातर जमा करणे आवश्यक वाटत असल्याने रिक्षा चालक राजेश चंद्रकांत संघावार व त्यांचे सहकारी हे शेखर हिरवे यांना घेवून पोलीस ठाणे येथे आले.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी प्रथम रिक्षा चालक राजेश संघावार यांचे कामगिरी व इमानदारीचे कौतुक केले. तसेच सदर लॅपटॉप घेणेसाठी आलेले प्रतिनिधी व मुळ मालक यांचे बाबत योग्य खातरजमा करुन परत करणे करीता ठाणे अंमलदार सचिन अडसुळ यांना सुचना दिल्या.

त्याप्रमाणे योग्य खात्री करुन सदरचा लिनीओ कंपनीचा अंदाजे ७०,०००/- ( सत्तर हजार रुपये किंमतीचा) लॅपटॉप परत करण्यात आला आहे. सदरचा लॅपटॉप परत मिळाल्याने श्री. शेरख हिरवे, सुरज हेमराजनी व इतर स्थानिक नागरिक यांनी रिक्षा चालक राजेश संघावार यांचे व पोलीस दलाचे चांगले कामगिरीचे कौतुक केले आहे.

रिक्षा चालक राजेश संघावार यांनी त्यांचे हालाकीचे व गरीब परिस्थिती व कष्टाचे काम करीत असतांना देखील कोणताही लोभ न बाळगता सदरचा लॅपटॉप पोलीस ठाणेस येवून मुळ मालकास परत करुन मानुसकीचे उत्तम उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे. त्यांचे उत्कृष्ट कामाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी दखल घेवून त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आहे.

सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, मा. पोलीस उप- आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे, पोलीस अंमलदार सचिन अडसुळ, तानाजी देशमुख, निलेश पालवे, शितल मेमाणे, प्रितम लाड, मनिषा बर्वे व इतर टिम यांनी केली आहे.