न्यूज प्रहार ( पुणे ) :- हडपसर परीसरात एकावर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील शेवाळवाडी नाकाच्या परिसरात सकाळी घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेवाळवाडी परिसरातील नाक्याजवळ घडली.
या गोळीबारात जयवंत खलाटे राहणार गोंधळे नगर हडपसर, यावर गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. अवघ्या काही तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या हडपसर पोलिसांनी आवळल्या. सुधीर रामचंद्र शेंडगे राहणार शेवाळवाडी तालुका हवेली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तर गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .मात्र हा गोळीबार कशासाठी केला याची नेमकी माहिती अद्याप मिळू शकली नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.