न्यूज प्रहार ( मुंढवा ) – कर्तव्यनिष्ठ आणि आपल्या कर्तव्याची जाणीव असणारे एक पोलीस एक खेळाडू एक योद्धा आणि एक जीव ओलीस धरून लोकांचे रक्षण करणारा खरा रक्षक. तानाजी दादासाहेब देशमुख आपण आपल्या कर्तव्याची जाणीव योग्य रीतीने या समाजापुढे मांडण्याचे काम केलं समाजात आलेले अनेक संकटे असतील अनेक प्रकारचे गैरसमजातून घडलेले अनुचित प्रकार असतील या सर्वांना आळा घालत आपण एक वेगळा आदर्श या समाजात निर्माण केला. आपण पोलीस असून देखील सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळून विविध लोकांची कामे मार्गी लावली. आणि खेळाडू घडवण्याचं देखील काम आपल्या माध्यमातून गेले अनेक वर्ष झाले घडत आहे.
मुलींसाठी वेगवेगळे उपक्रम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये उभे राहून उंच आकाशी झेप घ्यावी इथपर्यंत आपण केलेले प्रयत्न. अनेक शाळा महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन. या सर्व गोष्टी एक पोलीस म्हणून आणि एक रक्षक म्हणून समाजासाठी फार मोलाच्या ठरल्या. कोरोना सारख्या महाभयंकर काळामध्ये आपण अनेक गोरगरिबांना केलेली मदत असेल, वयोवृद्धांना केलेली मदत असेल किंबहुना बेघर झालेल्या जनावरांची देखील मदत असेल.
आपण निष्ठेने पार पाडली. समाजात मूळ आपलं भलं नाही तर आपल्यामुळे समाजाचं भलं झालं पाहिजे या नीतिमत्ताचे असणारे तानाजी दादा आपण केलेल्या या सर्व गोष्टी आम्ही जाणल्या आणि वाचल्या. म्हणूनच 2024 वर्षाचा राज्यस्तरीय सेवा रत्न पुरस्कार देऊन आम्ही आपणास सन्मानित करीत आहोत. हा सन्मान देत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.