Newsprahar

राष्ट्रवादी काँग्रेस शहर सरचिटणीसच्या मुलावर हल्ला…

दांडेकर पूल परिसरातील घटना.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार.

पुणे : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. शहरात मुख्य पक्षानी उमेदवार घोषित केले आहे. त्यांचा प्रचारही सुरु झाला आहे. आशातच गुन्हेगारानेही डोकं वर काढलं असून बुधवारी सायंकाळी दांडेकर पूल येथील राष्ट्रवादी काँग्रेस शहर सरचिटणीसच्या मुलावर कोयता गँगने हल्ला केला आहे तर त्याच्या दोन मित्रावर धारदार कोयत्याने वार करण्यात आले आहेत. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दांडेकर पूल येथील कदम गँगच्या तेरा जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मयूर राम पालखे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी जखमी मयूर हे पुणे पालिकेत काम करीत आहेत. तर त्यांचे वडील राम पालखे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी दोन वेळा महापालिका आणि एक वेळा पर्वती विधानसभा निवडणूक लढाविली आहेत. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला असून त्याची शहर सर चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

तर दांडेकर पूल परिसरात कदम गँगची दहशत आहे. पालखे यांनी लोकसभा निवडकीत कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करू नये, यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातं आहे. यामधून मयूर याच्या वर कदम गँगने हल्ला केला.यात मयूर गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोके, डोळा आणि गळ्यावर गंभीर दुखापत झाली आहे.तर त्याच्या मित्रावर वार करण्यात आले आहेत.

दरम्यान या भागातील कदम गँगची दहशत कायमची संपुष्टात यावी यासाठी आरोपी वर मोका अंतर्गत करावाई करावी अशी मागणी पालखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.