वाळू माफियांच्या नावांचा लवकरच पुढील बातमीत खुलासा…
न्यूज प्रहार (पुणे) : हवेलीतील वळती या परिसरातून शेतकऱ्यांच्या रानाचे अक्षरशा स्थानिक वाळू माफीया लचके तोडू लागले आहेत दिवस रात्र हजारो ब्रास बेकायदेशीर वाळू शेतातून उपसा केली जात असल्याचे चित्र आहे. महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे.
गेल्या अनेक महीण्यान पासून हवेली तालुक्यातील वळती या भागातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. शासनाकडून कुठलेही टेंडर काढण्यात आलेले नसताना. बेकायदेशीर वाळूची चोरी करून शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे. मात्र महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियावर अद्याप कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हवेली तालुक्यातील वळती परिसरातून हजारो ब्रास वाळूची चोरी दिवसा ढवळ्या होत असल्याचे चित्र आढळून आले आहे.
शासनाच्या परवानगीविना रोज हजारो ब्रास वाळूचा उपसा शेतकऱ्याच्या रानातून सुरू आहे. जेसीपी व ट्रॅक्टरद्वारे वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रात्री व दिवसा वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात असल्याचे चित्र दिसत असताना महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून यावर कुठलीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.
त्यामुळे हवेली परीसरात सुरू असलेला वाळू उपसा महसूल विभागाच्या संमतीने सुरू आहे कि काय? असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
याकडे महसूल विभाग, पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन हा प्रकार थांबवून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होऊ लागली आहे.