Newsprahar

साऊंड बॅाक्स बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग; येरवड्यातील धक्कदायक घटना…

न्यूज प्रहार ( येरवडा ) : येरवड्यात बालाजीनगर येथे एका साऊंड बॅाक्स बनविणाऱ्या  कारखान्याला  आज (शनिवारी) सकाळी सहा वाजण्याची सुमारास भीषण आग लागली. यामध्ये कारखान्यातीत साऊंड बॅाक्ससह शेजारील लाकडी साहित्य आगीत भस्मासात झाले.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झालेल्या आहे. या आगीत गोडाऊन मधील लाकडी साहित्य संपूर्ण पेटले असून आत मध्ये असणाऱ्या इतर साहित्याचे देखील संपूर्ण नुकसान झालेले आहे.