न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : दिनांक २९/०२/२०२४ रोजी रात्री ०२.३५ वा. दरम्यान फिर्यादी युक्तीकुमार सारंगपाणी निंबाळकर, रा. पुनावळे इमारत, शिंदे वस्ती, जय महाराष्ट्र चौक, केशवनगर, मुंढवा, पुणे हे मोटार सायकल वरुन चैतन्यबार, केशवनगर मुंढवा पुणे येथून जात असतांना त्यांना अज्ञात रिक्षा चालक यांनी अडवून जवळ हॉटेल कोठे आहे, जवळ आहे का असे बोलण्यामध्ये गुंतवून रिक्षामधील मागे बसलेल्या इसमांनी खाली उतरुन गचंडी पकडून हाताने मारहाण करुन एकाने दगडाने डोक्यात मारुन गंभीर जखमी करुन बळजबरी पॅन्टचे खिशामध्ये हात घालून रोख रक्कम रुपये ७,०००/- काढून घेवून पळुन गेले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळावर जावून घटनास्थळाची पाहणी करुन सदर घटनेची माहिती घेतली. सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेणे करीता तपास पथक अधिकारी अंमलदार यांना रवाना केले.
तसेच जखमी फिर्यादी यांना तात्काळ उपचार करणे करीता वैद्यकीय अधिकारी, ससुन हॉस्पीटल येथे पाठवून उपचार करून घेतले आहेत. तसेच फिर्यादी यांचे तक्रारीवरुन मुंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ९३/२०२४ भा.दं.वि कलम ३९७, ३९४, ३४१, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपीचा केशवनगर पोलीस चौकी भागात शोध घेत असतांना पोलीस अंमलदार महेश पाठक यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली “गुन्हयात वापरलेली रिक्षा ही कल्याणी बंगला रोड मोकळया मैदनात उभी आहे” अशी बातमी प्राप्त झाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना दिली असता त्यांनी बातमीची खातरजमा करून, बातमीची खातरजमा झाल्यास योग्य ती कायदेशीर ठोस कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे सदर ठिकाणी जावून रिक्षाची खात्री केली असता, सदर रिक्षामध्ये दोन इसम मिळुन आले, त्यामधील एक इसम अपंग असल्याचे दिसल्याने फिर्यादी यांनी सांगितलेल्या वर्णनाची खात्री झाली. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक, महादेव लिंगे यांचे सुचनाप्रमाणे त्यांना ताब्यात घेवून नाव व पत्ता विचारले असता १) अक्षय आण्णासाहेब शिंदे वय २५ वर्षे, रा. कॉलनी नंबर १०, संकेत विहार, डिरे कंपनीजवळ, काळेपडळ, हडपसर, पुणे २) महेंद्र एकनाथ शेलार, वय ४५ वर्षे, रा. सर्व्हे नंबर २३१, निर्मल टाऊन जवळ, काळेपडळ, हडपसर, पुणे असा असल्याचे सांगितले. नमुद ताब्यातील इसमास विश्वासात घेवून तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांना दाखल गुन्हयाचे अनुषंगाने अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे
शहर मा. अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, मा. पोलीस उप- आयुक्त, आर राजा, परिमंडळ – ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे, पोलीस उपनिरीक्षक, महादेव लिंगे, सहा. पोलीस फौजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, महेश पाठक, देवानंद खाडे, सचिन मेमाणे, निलेश पालवे, सचिन पाटील, दयानंद गायकवाड यांनी केली आहे.