चाळीसगांव :- रेल्वे स्टेशन परिसरातील फुले नगर मधील अल्पवयीन मुलीस आपल्याला कामाला जायचे आहे असे सांगून रमाबाई अजय शिंदे (वय ५५) रा. राखुंडे चाळ, जुना मालेगांव रोड हिने मालेगांव बायपास रोड परिसरात असलेल्या हॉटेल निवांतमध्ये असलेल्या झोपडीत नेले.
या ठिकाणी रविंद्र ऊर्फ बापू अर्जुनसिंग राजपूत (वय ५४ रा. जुने मराठा मंगल कार्यालय, ईच्छादेवी रोड, चाळीसगांव) हा बसलेला होता. त्याने आणि रमाबाई शिंदे हिने मुलीला या ठिकाणी असलेल्या झोपडीत बसवले त्यानंतर या दोघांनी केवलसिंग ऊर्फ संजू जयसिंग कच्छवा (वय ५३ रा. पोस्टल कॉलनी, धुळे रोड, चाळीसगांव) यास बोलविले .
के वलसिंग या ठिकाणी आल्यानंतर तो आणि रविंद्र असे दोघे झोपडीत गेले त्यावेळी रमाबाईने झोपडीचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर रविंद्र ऊर्फ बापू अर्जुनसिंग राजपूत आणि केवलसिंग ऊर्फ संजू जयसिंग कच्छवा यांनी मुलीवर सामुहीक बलात्कार केला. सदरची घटना १८ जानेवारी २०२४ चे दुपारी १२ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली.
या घटनेनंतर पिडीत मुलीला सदरची घटना कुणाला न सांगण्याचा दम रमाबाई हिने दिला. तु कुणाला ही गोष्ट सांगितली तर तुझीच बदनामी होईल असेही पिडीत मुलीला रमाबाईने सांगितले. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला आरोपींच्या विरोधात आय.पी.सी. ३७६ (२) (एन), ३७६ (डी), सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ३ (अ), ४ (२), ५ (ग), ६,१६, १७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विशाल टकले हे करीत आहेत. ज्या पिडीत मुलीवर वरील दोघा हरामखोरांनी सामुहिक बलात्कार केला ती अल्पवयीन मुलगी चाळीसगांव येथे नुकत्याच पार पडलेल्या शिवपुराण कथा कार्यक्रमात येणाऱ्या भाविकांसाठी पोळ्या लाटून देण्याचे काम करीत होती. विशेष म्हणजे ही मुलगी अल्पसंख्यांक समाजाची असल्याचे समजते.
तिच्यावर झालेला सामुहिक बलात्काराचा प्रकार १८ जानेवारीला दुपारी १२ ते ५ वाजेच्या दरम्यान झालेला आहे. मात्र तिने भितीपोटी या प्रकाराच्या अनुषंगाने कोणतीही वाच्यता केली नाही मात्र नंतर तिला रक्तस्त्राव होवू लागल्याने ती
उपचारासाठी दवाखान्यात गेली. तेव्हा डॉक्टरांनी तिला होत असलेल्या रक्तस्त्रावाच्या अनुषंगाने खरी माहीती सांगण्याचा आग्रह केला तेव्हा तिने आपल्यावर ज्यांनी सामुहिक बलात्कार केला त्या संदर्भातली सविस्तर माहीती डॉक्टरांना सांगितल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला.