Newsprahar

परराज्यातुन पळुन आलेला १६ वर्षीय मुलगा सुखरुप कुटूंबियांचे ताब्यात ; मुंढवा पोलिसांची कामगिरी…

मुंढवा प्रतिनिधी : मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील ताडीगुत्ता चौक येथे तृतीतपंती सोबत एक लहान मुलगा असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाल्याने, लहान मुलगा असल्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी तात्काळ ताडीगुत्ता चौक येथे सहा. पोलीस फौजदार उगले व स्टाफ पाठवून खातरजाम करण्यास सांगितले. सदर ठिकाणी तृतीयपंथी शिवाज्ञा रोहित रॉय रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे यांचे सोबत कु. करण रवि कंडा, वय १६ वर्षे, रा. हनुमानगढ, राज्यस्थान हा मिळून आल्याने त्यांना मुंढवा पोलीस ठाणे येथे घेवून आले. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी सदर बाबत सहा. पोलीस फौजदार उगले यांना कु. करण यांचेकडे सहानुभुतीपुर्वक मायेने विचारपुस करुन चौकशी करणे बाबत आदेशित केले. तेव्हा कु. करण हा राज्यस्थान येथून राहते घरातून कोणास काहीएक न सांगता निघुन आला असल्याचे सांगितले. तसेच पळून येणे बाबत विचारले असता मनासारखे जिवन जगण्यासाठी घर सोडून निघुन पुण्याला आलो आहे. 

राज्यस्थान हनुमानगढ पोलीस ठाणे येथे संपर्क करुन सदर मिसिंग मुलगा मिळुन आला असल्याची माहिती देवून अधिक माहिती घेतली असता राज्यस्थान राज्यातील कु. करण रवि कंडा, वय १६ वर्षे हा कोणाला काहीएक न सांगता निघुन गेला असून नातेवाईकांचे तक्रारीवरुन हनुमानगढ टाऊन पोलीस ठाणे, राज्यस्थान येथे गुन्हा रजि. नंबर ७८/२०२४ भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

तसेच तृतीसपंथी शिवाज्ञा रॉय यांनी देखील कु. करण यास चुकीचा मार्ग न दाखविता, तो नैराश्यात असल्याने त्यास आधार देवून, स्वतःजवळ सहारा देवून माणुसकीची जाण करुन दिली. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा यांनी त्यास नैराश्यातुन बाहेर काढून समुपदेशन करुन आयुष्य किती सुंदर आहे, आयुष्य जगतांना कुटूंबियांची आवश्यक असलेली साथ, तसेच चांगल्या व वाईट घटनांचे उदाहरण देवुन, त्याचे मनामध्ये चांगले जिवण जगण्याची आशा पल्लवीत केली.

राज्यस्थान हनुमानगढ पोलीस ठाणे येथे संपर्क करुन सदर मिसिंग मुलगा मिळुन आला असल्याची माहिती देवून मुंढवा पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले. हनुमानगढ पोलीस ठाणेचे सहा. पोलीस फौजदार दारीया सिंह तसेच मिसिंग मुलाचे नातेवाईक अशोक कुमार व विजय कुमार, रा. हनुमानगढ हाऊन, राज्यस्थान यांचे सुरक्षित ताब्यात देण्यात आले आहे.

मिसिंग मुलागा कु. करण रवि कंडा यांने पोलीसांचे आभार माणुन, “केलेल्या सहकार्याबद्दल आभार माणुन, यापुढेचे आयुष्य अतिश चांगल्या पद्धतीने व चांगले जगेल. मोठा अधिकरी होवुन पुन्हा भेटायला येईल.” असे बोलून पोलीसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले, तसेच राज्यस्थान पोलीसांनी व मिसिंग मुलांचे नातेवाईक यांनी तृतियपंथी शिवाज्ञा रोहित रॉय व पुणे शहर व मुंढवा पोलीसांचे आभार माणुन कामगिरीचे कौतुक केले आहे. सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मा. पोलीस उप-आयुक्त, आर राजा, परिमंडळ – ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार, पोलीस उपनिरीक्षक, सदाशिव गायकवाड, पोलीस अंमलदार रमेश उगले, सचिन मेमाणे व इतर यांनी केली आहे