पिंपरी-चिंचवड : हिंजवडीतील आयटी हब मधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका आयटी इंजिनिअर महिलेची तिच्याच प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली आहे.
एका लॉजमध्ये या महिलेचा मृतदेह मिळाला आहे. प्रेम संबंधातून हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. ऋषभ निगम आरोपी प्रियकराचे नाव आहे. आरोपी व महिला हे दोघेही लखनऊचे असून आयटी कंपनीत काम करायचे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ व महिला दोन दिवसांपासून लॉजमध्ये राहायला होते दरम्यान आरोपीने महिलेची लॉजमध्येच गोळ्या झाडून हत्या केली. हत्यानंतर तो मुंबईला पळून गेला. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान पिस्टल सह अटक केली. प्रेम प्रकरणातून हत्या महिलेची झाल्याचे उघड झालं आहे.