फुरसुंगी – सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल भेकराई नगर येथे आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी शाळेच्या प्रांगणात ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री सोमनाथ हरपळे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नसीमा शेख मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती :
सोमनाथ शेठ हरपळे . (संस्थापक अध्यक्ष सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल)
साईराज हरपळे.
कॅप्टन अशोक सस्ते सर.
हवालदार सूर्यवंशी सर.
सुभेदार लांडगे सर .
सुभेदार जाधव सर.
सुभेदार हमीद शेख.
सौ .अर्चना हरपळे मॅडम.
शालन जगताप मॅडम. (रामवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी)
सुचिता हरपळे मॅडम. (न्यूज प्रहार संपादिका)
हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुचिता हरपळे मॅडम आणि शालन जगताप मॅडम यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- नसीमा शेख मॅडम यांनी खूप गोड शब्दांतून केले.
यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने साठे मॅडम , ज्योती मॅडम ,गुंजाळ मॅडम ,अश्विनी मॅडम यांनी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीने संविधान लिहिले हे देखील त्यांनी मुलांना सांगितले.
याप्रसंगी शाळेतील विदयार्थ्यांनी विविध रोचक कार्यक्रम सादर केले. यात थोर नेत्यांच्या वेशभूषा साकारत कार्यक्रमाची शोभा वाढवली. लेझीम पथक, संचलन, कराटे सादरीकरण, तसेच देशभक्ती पर भाषणे, देशभक्ती पर गीत गायन, देशभक्ती पर नृत्य व अनेकात एकता दाखवणारी पोशाख, असे विविध उत्साही कार्यक्रम विदयार्थ्यांनी सादर केले.
तसेच आठवी नववीच्या मुलांनी प्रभू श्रीरामचंद्रांची व्यक्ती रेखा रेखाटून कार्यक्रमाची शोभा वाढवली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक वाहिद शेख सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी पालक, गावकरी, सर्व विद्यार्थी, विदयार्थिनी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते. या कार्यक्रमाची सांगता शेवटी वंदे मातरम घेऊन खूप आनंदाने झाली.