Newsprahar

“मुंढवा पोलीस ठाणेकडील बिट मार्शलचे कर्तव्य तत्परतेमुळे विजयानगर पोलीस ठाणे गुन्हयातील पिडीत मुलगी सुखरुप…

मुंढवा प्रतिनिधी : दिनांक २२/०१/२०२४ रोजी विजयानगर पोलीस ठाणे, मैसूर, राज्य कर्नाटक येथील गुन्हा रजि. नंबर ०९/२०२४ भादंवि कलम ३६३ मधील पिडीत मुलगी बी. टी. कवडे रोड, घोरपडीगाव, पुणे या भागात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक पोलीस ठाणे मदत घेवून सदर मुलीचा शोध घेणे असल्याने मुंढवा पोलीस ठाणे येथे आले होते. 

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी तात्काळ घोरपडी बिट मार्शल वरील अंमलदार विजय माने, किरण बनसोडे यांना बोलावून घेवून सदर घटनेची व सदर पिडीत मुलीचा शोध कोणत्याप्रकारे घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे मैसूर पोलीस ठाणे कडील अंमलदार व मुंढवा पोलीस ठाणे कडील अंमलदार यांनी सुमित्रा कॉर्नर, बी. टी. कवडे रोड, पुणे याठिकाणी जावून प्रथम पिडीत मुलीची आजु बाजूस माहिती घेवून खात्रीशिर माहिती प्राप्त करुन पिडीत मुलीस ताब्यात घेण्यात आले. 

पिडीत मुलीस पोलीस ठाणे येथे घेवून येवून पुढील कायदेशिर कारवाई करणे करीता मैसूर पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार व पिडीत मुलीचे नातेवाईक यांचे ताब्यात सुखरुप देण्यात आले. मुंढवा पोलीस ठाणे कडील पोलीसांचे या तत्पर कामगिरी बद्ल मैसूर पोलीस व मुलीचे नातेवाईक यांनी कौतुक केले, व पुणे शहर पोलीस दलाचे आभार मानले आहेत. सदरची कामगिरी, मा. पोलीस उप-आयुक्त, आर राजा, परिमंडळ – ५, मा. सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांचे सुचानाप्रमाणे पोलीस अंमलदार विजय माने व किरण बनसोडे यांनी केली आहे.

Leave a Comment