कंट्रोलला कॅाल देवूनही अवैधं पत्यांचे क्लब बंद होताना चे चित्र दिसत नाही…?ओतूर पोलीस स्टेशन च्या कलेक्टरवर पुणे पोलिस अधिक्षक काय कार्यवाही करणार असे नागरीक प्रश्न विचारू लागले आहेत…
( न्यूज प्रहार प्रतिनिधी ) : ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे हे वसूलदार साहेबांच्या कृपा आशीर्वादाने फोफावले आहेत. कारण पोलीस फक्त नाममात्र कारवाई करतात परंतु आतील बाजूने अवैध धंदेवाल्यांना आश्रय देतात. ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक नव्हे तर अनेक प्रकारचे अवैध धंदे आजही जोरदारपणे सुरू आहेत. नागरिक वारंवार तक्रार करतात परंतु नाम मात्र कारवाईमुळे आता नागरिकांची सहनशीलता संपत चाललेली दिसत आहे. असे न्यूज प्रहारच्या प्रतिनिधीशी बोलताना या परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे.
या परिसरात पत्त्यांचे क्लब अवैद्य गुटखा विक्री मोठे मटक्याचे धंदे अवैध दारू विक्री वेश्याव्यवसाय असे एक ना अनेक प्रकारचे, अवैद्य धंदे या परिसरात जोरदारपणे सुरू आहे तरी देखील पोलीस आम्हाला काही माहितीच नाही अशा अविर्भावात फिरताना दिसतात. परंतु कारवाईची वेळ आली की अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालून.आश्रय सुद्धा याच पोलीस स्टेशनचे वसुलदार साहेब देत आहेत. अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे कुंपणच शेत खाते की काय? अशी परिस्थिती ओतूर पोलीस स्टेशनची झालेली दिसत आहे.
या परिसरात पत्त्यांचा क्लब हा बबन शितोळे रोहन शहा हे ओतूर बस स्टॅन्ड जवळ आळे फाटा रोड सोनिका बिअर बार च्या माघे २०० मि. अंतरावर कल्याण रोड येथे चालवला जातो. ओतूर जवळील खामुंडे गावात मारुती तांबे नावाचा इसम पत्त्यांचा क्लब चालवतो. तसेच नानू शहा नावाचा इसम मोठा मटका चालवतो. याच परिसरात अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने गुटखाबंदी असतानाही आजूबाजूच्या परिसरामध्ये गुटखा विक्री करतात. जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, खेड, चाकण बेल्हा या परिसरात पद्धतीने गुटखा विक्री करतात, अशी माहिती स्थानिक नागरिकांमधून मिळत आहे या सर्व मोठ्या अवैध धंद्यावाल्यांना याच पोलीस स्टेशनचे अभय असल्याने कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
यावर पुणे पोलिस अधीक्षक कोणती कारवाई करतील का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे तसेच या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या वसुलदार पोलीस कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करतील का? असे प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहेत. तसेच महाराष्ट्रात गुटखा विक्र बंदी असताना सुद्धा हे दोघे इसम या परिसरातून व आजूबाजूच्या परिसरात गुटखा सप्लाय करतात तरी देखील पोलीस कोणती कारवाई का करत नाही, असा प्रश्न सुद्धा स्थानिक नागरिक विचारत आहेत. या दोघांचे गुटखा साठवण केलेली जागा ही ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते तरीहि पोलीसांना यांचे ठिकाणी का सापडत नाही असे प्रश्न सुद्धा नागरिक करत आहेत.