Newsprahar

एफटीआयआय’ मध्ये घुसून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थ्यांना बेदम मारहाण…!

अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर त्याचे वेगवेगळे पडसाद उमटू लागले आहेत. पुण्यातील नॅशनल फिल्म इंस्टिट्यूटमध्ये  ‘बाबरी’ मशीदीच्या  विषयावरून राडा झाला.

पुणे  : अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिरात  प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर त्याचे वेगवेगळे पडसाद उमटू लागले आहेत. पुण्यातील नॅशनल फिल्म इंस्टिट्यूटमध्ये ‘बाबरी‘ मशीदीच्या  विषयावरून राडा झाला. ‘एफटीआयआय‘मध्ये ‘एफटीआयआय स्टूडंट्स असोसिएशन‘ या संघटनेच्यावतीने बाबरी मशीदीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले.

रिमेंबर बाबरी‘ ‘डेथ ऑफ कॉनस्टीटयूशन असे फलक लावण्यात आलेले होते. तसेच, ‘फॉलन शाल राईज’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. या आंदोलनाची माहिती मिळताच शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते एफटीआयआयच्या आवारात घुसले. त्यांनी या हे आंदोलन उधळून लावत जय श्री रामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी लावलेले फलक फाडण्यात आले. तसेच काही फलक पेटवून देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Leave a Comment