Newsprahar

स्थानिक गुन्हे शाखा, व नारायणगाव पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी ; वृद्ध महिलेचा खून करून जबरी चोरी करणारी पती- पत्नीची जोडी ४८ तासांचे आत जेरबंद…

पुणे प्रतिनिधी ; मौजे मांजरवाडी ता. जुन्नर, जि. पुणे गावातील धनवटमळा येथील महिला नामे सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे वय ७० वर्षे या एकटया घरी असताना त्यांचा त्यांचे राहते घरी कोणतरी अज्ञात व्यक्तीने गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला होता. त्यांचे घरातील कपाट उचकटलेले व कपडे अस्ताव्यस्त होते. सदर प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६५ / २०२४ भा.दं.वि.का.क. ३०२, प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला होता.

सदरचा गुन्हा हा दिवसा ग्रामीण भागातील लोकवस्तीत घडल्याने गुन्हयाचे गांभीर्य वाढले होते. मा. श्री
पंकज देशमुख साो., पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे साो. पुणे
विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या. स्था.गु.शा. चे पथक व नारायणगाव पोलीस स्टेशनकडील पथके तयार करून घटनास्थळाकडे येणारे सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासण्यात आले.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, खोडद
परीसरात शेत मजुरीसाठी वाशिम जिल्हयातील एक पती-पत्नीचे जोडपे आले होते, ते जोडपे अचानक आठ
दिवसांपूर्वी निघुन गेले होते, परंतु ते पती-पत्नी गुन्हा घडलेल्या धनवट मळा परीसरात घटनेच्या दिवशी दिसून
आले होते. अशी बातमी मिळाल्याने संशयित जोडप्याची माहिती मिळवून स्था.गु.शा. चे पथक नारायणगाव पो स्टे कडील स्टाफ मदतीला घेवून वरीष्ठांचे परवानगीने वाशिम जिल्हयाकडे रवाना झाले.

 

दरम्यान संशयित पती-पत्नी हे अहमदनगर एस.टी.स्टँड परीसरात थांबलेले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना त्या ठिकाणाहून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी त्यांचे नाव : 

 १) शिवम ऊर्फ संकेत शाम श्रीमंत, वय २१ वर्षे, 

२) पुनम संकेत श्रीमंत, वय २० वर्षे, दोघे मुळ रा. गजानन नगर, चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा,

त्यांनी नमुद गुन्हा केल्याचे व मयत सुलोचना टेमगिरे यांचे राहते घरातून त्यांचा मोबाईल व सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. त्यांचेकडून मयत सुलोचना टेमगिरे यांचा चोरी केलेला मोबाईल हस्तगत करणेत आलेला आहे. त्यांनी चोरी केलेले सोन्याचे दागिन्याबाबत त्यांचेकडे चौकशी चालू असून सदर गुन्हयास भा.दं.वि.क. ३९७,३४ असे वाढविणेत आले आहे. दोन्ही आरोपींना मा. जुन्नर न्यायालयात हजर करणेत येणार असून पुढील तपास नारायणगाव पो. स्टे व स्था. गु.शा. चे पथक करत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक
श्री. रमेश चोपडे साो. पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पो.स्टे. चे सपोनि महादेव शेलार,
स्था. गु.शा.चे सपोनि राहुल गावडे, पोसई अभिजीत सावंत नारायणगाव पो.स्टे. चे पोसई सनील धनवे, जगदेवाप्पा पाटील, विनोद धुर्वे, स्था. गु. शा. चे पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीण, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, अक्षय नवले, संदिप वारे, शैलेश वाघमारे, तुषार भोईटे, संतोष कोकणे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सत्यम केळकर, निलेश शिंदे, अक्षय सुपे, दगडू विरकर, सचिन सातपुते, आदिनाथ लोखंडे, गोविंद केंद्रे, मंगेश लोखंडे, दत्ता ढेंबरे, महिला अंमलदार तनश्री घोडे यांनी केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस.