Newsprahar

सासवड परिसरात अवैद्य धंदे जोरात ; पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली…

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला जुगारून सासवड पोलीस स्टेशन परिसरात अवैद्य धंदे जोमात…

न्यूज प्रहार (सासवड) – पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू व नदी नाले,ओढा,शेती मधून वाळू चोरी,गुटखा विक्री अशा धंद्यांचे स्तोम माजलेले दिसत आहे. पोलीस प्रशासन कारवाई करण्याऐवजी हवालदार मुजावर व त्यांचे सहकारी हवालदार पोटे वरिष्ठांची दिशाभूल करून ‘हप्ता वसूल‘ करण्यात मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे परंतु एवढे असूनही वरिष्ठ अधिकारी शांत बसलेले दिसून येत आहेत. याचे कारण काही वेगळे तर नाही ना? स्वच्छ प्रतिमा असलेले पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

सासवड पोलीस स्टेशन परीसरात ढाबे व हॅाटेल येथे सर्रासपणे दारू विक्री  दिवस रात्र सुरू असल्या बाबत चे चित्र सध्या कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे हे मात्र कोडेच आहे? सासवड परीसरात सर्वच ठिकाणी “तेरी भी चूप मेरी भी चूप” अशा पध्दतीने ढाब्यांवर दारू विक्री सुरु आहे. तसेच सासवड परीसरातून नदी, ओढा,शेती येथून वाळू चोरी,गुटखा,गावठी दारू, ताडी, गांजा यांची विक्री राजरोसपणे जागा बदलून सुरू आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे, मात्र संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत तक्रार करायची तरी कोठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

⭕परवाने नसताना गुटखा व मद्यविक्री⭕

सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना अनेक हॉटेल बाहेरील टपऱ्यांवरती व्यावसायिक गुटखा व मद्यविक्री करत आहेत. अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे वेगळे हप्ते असल्याचे हॉटेल व पान टपरी व्यावसायिक सांगत आहेत.

“सामान्य नागरिक, महिला यांना या अवैध धंद्यांचा अफाट त्रास होत आहे. अल्पवयीन मुलांमध्येही नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. कौटुंबीक वाद होत आहेत. पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे.”

परंतु पोलीस हेच रक्षक नसून सर्वसामान्य जनतेचे भक्षक झाले आहेत.कारण अवैद्य धंदेवाल्यांचे पोलीसच पाठीराखे असल्यामुळे सामान्य जनतेने करायचे तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर पुणे पोलीस अधीक्षक योग्य ती कारवाई करणार का व संबंधित हॉटेल चालक व अवैध धंदे चालकांवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. हे फक्त नागरिकत सांगत नाहीत तर न्यूज प्रहारच्या प्रतिनिधींनी देखील याची पोल खोल केली आहे.

कारण बऱ्याचदा असे म्हटले जाते की आमच्या हद्दीतील सर्वच अवैद्य धंदे बंद आहेत परंतु रात्री उशिरापर्यंत  हॉटेल मध्ये दारू विक्री सुरूच असते. तरी देखील पोलीस म्हणतात की आमच्या हद्दीत काहीच चालू नाही याचा पुरावा म्हणून फोटो पाठवण्यात आले होते, परंतु तरी देखील या पोलीस स्टेशनी कोणतीही कारवाई केली कि नाही याबाबत शंका आहे.