महागडे लॅपटॉप व मोबाईल चोरणारे परराज्यातील दोघा भावांना अटक, त्यांचेकडून लाखो रुपयाचे महागडे लॅपटॉप व मोबाईल विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने केले जप्त.
NEWS PRAHAR ( पुणे ) : विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशनच्या हददीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील संजय बादरे, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांना त्यांचे खास बातमीदाराकडून बातमी मिळाली की, धानोरी रोड येथे पाण्याचे खदाणीजवळ भिमनगर झोपडपटटीच्या पुढे दोन इसम थांबलेले असून त्यातील एकाचे पाठीवर काळया रंगाची सॅक बॅग असून त्यामध्ये काहीतरी संशयीत वस्तू ठेवल्या आहेत.
अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड व स्टाफ यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून सदर ठिकाणी संशयीत म्हणून दोन इसमांना पकडून पोलीस स्टेशन येथे आणले असता त्यांचेकडे असलेल्या बॅग मध्ये एकुण ४ लॅपटॉप व ७ मोबाईल हँन्डसेट मिळून आल्याने व त्यातील काही मालाबाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याने त्या गुन्हयात
१) बाबू राममुर्ती बोयर वय २९ वर्षे, रा. लोणी स्टेशनच्या जवळ, कदम-वाक वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे मुळ गाव माधनुर, ता अंबुर, जि. वेल्लूर, राज्य आंध्रप्रदेश
२) सुरेश राममुर्ती बोयर वय २४ वर्षे, रा. लोणी स्टेशनच्या जवळ, कदम-वाक वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे मुळ गाव माधनुर, ता अंबुर, जि. वेल्लूर, राज्य आंध्रप्रदेश
यांना अटक करून मा. न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली असून आरोपींनी ते राहत असलेले लोणी स्टेशनच्या जवळ, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे येथील घरातून एकुण १५ वेगवेगळया कंपनीचे लॅपटॉप, ५६ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल व ५ डिजीटल घडयाळे जप्त करण्यात आलेली असून आरोपींकडून आत्तपर्यंत एकुण १९ लॅपटॉप, ६३ मोबाईल फोन व ५ डिजीटल घडयाळे असा एकुण ३१,३९,०००/- रुपयाचा माल हस्तगत केला असून त्यामध्ये विश्रांतवाडी (२गुन्हे), विमानतळ (२गुन्हे), लोणीकंद (३गुन्हे), दिघी (१गुन्हा), भोसरी (१गुन्हा) या प्रमाणे एकुण ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती आरती बनसोडे, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, मा. श्रीमती कांचन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे, श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री नितीन राठोड पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार बबन वणवे, दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, शेखर खराडे, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांचे पथकाने केली आहे.