पुण्यातील मसाज सेंटरचे मालक : जाधव साहेब (DJ) यांचे सरासरी 50 स्पा सेंटर व पांडे साहेब यांचे सरासरी 19 स्पा सेंटर आहेत ,अशा मोठ्या स्पा सेंटरवर व याच स्पा सेंटर चालकांवर पुण्याचे सीपी साहेब कोणती कारवाई करणार ?
न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. पुणे शहरात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु होता परंतु आता तो आटोक्यात आला आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले होते परंतु नवीन पोलीस कमिशनर साहेब आल्यापासून नागरिकांमधील भीतीचे वातावरण बऱ्यापैकी कमी झाले आहे . खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना घडत आहेत.
परंतु पुणे शहरात आता वेगवेगळ्या पोलीस स्टेशन परीसरात उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये मसाज सेंटर सुरु झाले आहेत. या मसाज सेंटरच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय केला जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यामुळे सांस्कृतिक पुण्यात हे काय सुरु आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
काय असते मसाज सेंटर…
पाश्चात्य देशांमधील स्पा सेंटर किंवा मसाज सेंटर नावाचा फंडा होता. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून भारतात आला आहे. आता पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातही स्पा सेंटर किंवा मसाज सेंटरचे बोर्ड अनेक ठिकाणी लावलेले दिसतात. या ठिकाणी स्वीडिश, डिप टिश्यू आणि ट्रिगर प्वाइंट असे वेगवेगळे पर्याय देऊन मसाज केली जाते. यामाध्यमातून आता ग्राहकांना शोधून वेश्याव्यवसाय चालवला जात आहे. पुणे शहरात काही मसाज सेंटर निवासी संकुलातही थाटले गेले आहे. यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे.
आता हे एवढ्यावर राहिले नाही तर वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या ॲप्लिकेशन विविध प्रकारच्या जाहिराती करून आता हे मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करत आहेत यामध्ये नवीन टेक्निकल नुसार आता तुम्ही सांगा आम्ही कुठे यायचे तशी आम्ही तुम्हाला फुल सर्विस देऊ असेही सांगितले जाते यामध्ये एसएमएसद्वारे ग्राहकाला काय हवे नको ते विचारले जाते व तसा रेट ठरविला जातो व त्यानुसार वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली पुरवल्या जातात अशा प्रकारची सेवा देण्याचे काम मसाज पार्लरमध्ये हा प्रकार खूप वाढला आहे यामध्ये जस्ट डायल व ऑनलाईन मधून सुद्धा हे नंबर व ॲड्रेस मिळत त्यामुळे आता यांना नवीन ग्राहक शोधण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाही हे आता त्यांना अगदी काहीही न करता मिळतात.
यामध्येच आयुर्वेदिक स्पा सेंटरच्या नावाखाली जोरदारपणे वेश्या व्यवसाय सुरू आहे यावरती पुणे पोलीस कोणतीही ठोस कारवाई करत नाही कारण यांच्याकडे आयुर्वेदिक स्पा चे लायसन असते असे सांगितले जाते परंतु खरंच आयुर्वेदिक स्पा म्हणजे वेश्याव्यवसाय नाही का? यामध्ये पुण्यात व पुणे शहरात जवळपास 200 ते 300 स्पा सेंटर आहेत या प्रत्येक स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सर्रासपणे चालवला जातो.
यामध्ये सर्वात जास्त ठिकाणे कोरेगाव पार्क, सिंहगड कॅम्पस, बाणेर, कोथरूड, हडपसर, कोंढवा, वानवडी, विमाननगर, चंदन नगर, बावधन, पाषाण, येरवडा, डेक्कन, पुणे स्टेशन, चतुरशिंगी, शिवाजीनगर, मार्केट यार्ड, फरासखाना, कर्वेनगर, मुंढवा,नांदेड सिटी,खडकवासला या सर्व ठिकाणी विविध प्रकारच्या आयुर्वेदिक स्पा सेंटरच्या नावाखाली आजही वेश्याव्यवसाय जोरदार पणे सुरू आहे. यामध्ये काही ठराविक लोकांचे कोणाचे 10 कोणाचे 15 कोणाचे 20 अशाप्रकारच्या वेश्या व्यवसायाची दुकाने थाटलेली आहे.
यावर पुणे पोलीस कमिशनर साहेब काही कारवाई करतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे नवीन पोलीस कमिशनर आल्यापासून सर्व गुन्हेगारी कमी झाली परंतु गुटखा विक्री गांजा विक्री आणि वेश्याव्यवसाय यावर ठोस अशी कोणतीही कारवाई नवीन पोलीस कमिशनर साहेब यांनी अजूनही का केले नाही असा प्रश्न आता पुणे शहरातील लोक विचारत आहेत.