NEWS PRAHAR ( पुणे ) : माथाडी बोर्डाला जन माहिती अधिकारी नियमानुसार माहिती मागवली गेली सदरची माहिती प्राप्त झालेल्या पासून ते आज पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे व माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे, व सदरील कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार असलेले निरीक्षक राजेश मते वारंवार पदाधिकाऱ्यांची बाजू घेत असल्यामुळे व दिलेल्या माहिती अधिकार अर्जावर कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे , निरीक्षक राजेश मते व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
यासाठी विठ्ठल बिनवडे यांनी पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ श्रमशक्ती भवन या कार्यालयासमोर बेमुदतआमरण उपोषण सुरू केले आहे. परंतु यांच्या मागण्या काही केल्या पुणे माथाडी बोर्ड मान्य करत नाही. कारण यामध्ये कागदपत्रे पाहिले तर पूर्णपणे गोंधळ झालेला दिसून येत आहे . मागील एक वर्षापासून विठ्ठल बिनवडे हे हमाल पंचायत पुणे यांच्याशी व पुणे माथाडी बोर्ड हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ यांच्याकडे वारंवार तक्रारी अर्ज दिले आहेत.
सदर अर्जावरती कोणतेही कार्यवाही होत नाही हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जन माहिती अधिकार नियमानुसार माहिती मागवली परंतु त्यांना याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. सदर माहिती अर्ज अर्जावर त्यांनी विविध असे एकूण बारा अर्ज केलेले आहेत. परंतु पुणे माथाडी बोर्ड त्यांना कोणतेही उत्तर देण्यास बांधील नाही, अशा प्रकारे मूग गिळून गप्प बसले आहे.
कारण यामध्ये मार्केट यार्ड भुसार विभागातील वारई काम करणाऱ्या टोळ्या एक,दोन, तीन यांना उपनगरात काम करण्याबाबत जुन्या अभिलेखा प्रमाणे कोणतीही परवानगी नाही. तरी देखील यांना पूना डाळ अँड बेसन मिल्स पुना फ्लोअर फुड्स अँड मिल्स या टोळ्या एक,दोन,तीन या पूर्वीपासूनच काम करतात असे माथाडी मंडळाने सांगितले आहे, तर ते कामगार कसे भरले गेले याचे तपशील मागितले असता माथाडी बोर्ड पुणे यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.
त्यामुळे या टोळी मधील कामगार भरती ही अवैद्य पद्धतीने झाले आहे हे लक्षात येते. या टोळीमध्ये असणाऱ्या जुन्या कामगारांना नवीन कामगार हे अरेरावीची भाषा वापरून दादागिरी करत धमकावत असल्याचे समोर येत आहे. तरीदेखील माथाडी बोर्ड व सदर भागातील पोलीस स्टेशन यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही.
माथाडी बोर्ड नी ठरवून दिलेल्या जीआर अनुसार नवीन कामगारांची नोंद करता येत नाही,तरी देखील एक,दोन तीन टोळ्यांमध्ये नवीन कामगारांची वाढ माथाडी बोर्ड केली असल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे. या सर्व गोष्टींवर जन माहिती अधिकारातून माहिती मागविली असता कोणत्याही अर्जावरती यांनी प्रत्युत्तर दिले नाही व हे अर्ज प्राप्त होऊन सुद्धा अर्जदाराला कोणत्याही प्रकारे जुमानले गेले नसल्याचे लक्षात येत आहे.
अर्जदाराला धमकावले जात असल्याची माहिती ही समोर येत आहे. या सर्व त्रासाला कंटाळून शेवटी विठ्ठल बिनवडे यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. याला जबाबदार असणाऱ्या पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ कोणती कारवाई करेल का? तसेच या सर्व गोष्टींना पाठीशी घालणाऱ्या निरीक्षक राजेश मते साहेबांवर कोणती कारवाई होईल का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.