Newsprahar

राष्ट्रवादीचे मनसुबे निष्ठावंत शिवसैनिकांनी उधळून लावलेत…

NEWS PRAHAR ( महाबळेश्वर ) दि : ०१ ऑक्टोबर : शिवसेना महाबळेश्वर तालुका सोळशी कोयना कांदाटी विभागातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता.कार्य कुशल तालुकाप्रमुख संजयजी शेलार यांना एका रात्रीत बदलून राष्ट्रवादीच्या काही लोकांनी गणेश उतेकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गणेश उतेकर यांच्या गळ्यात तालुका प्रमुखाची माळ बहाल करून, शिवसेनेत दोन गट व उभी फूट पडेल,आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय सोपा होईल हीच अचूक वेळ टाइमिंग साधून राष्ट्रवादीच्या रणनीतीचा गमिनी कावा शिवसैनिकांनी धुडकावून लावला व आमच्याच काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना संपवण्याचा डाव होता पण तो डाव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.

आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तोंडावर आली असताना. उमेदवारी वाटप करायला हवे होते. ते सोडून तालुकाप्रमुख बदलण्याची रणनीती राष्ट्रवादीच्या गोठ्यातूनच सुरू झाली. कारण आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद राष्ट्रवादी जिंकू शकत नाही हे त्यांना पूर्ण समजल्यानंतर राष्ट्रवादीतून काही लोक शिवसेनेत दाखल झाले होते. पण ते पूर्णपणे शिवसैनिक नव्हतेच ते राष्ट्रवादीचीच धुरा सांभाळत होतेत कारण त्या लोकांना शिवसेना पोखरण्यासाठीच शिवसेनेत पाठवले होते. 

अडीच वर्ष साहेब मुख्यमंत्री असतानाही त्यां लोकांकडून कोणताही पक्ष प्रवेश झाला नव्हता. उलट त्या लोकांनी शिवसेनेचे काही लोक फोडून राष्ट्रवादीत सामील केलीत. नंतर जिल्हा पातळीवर संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख या पदाधिकाऱ्याना विश्वासात न घेता निवडी झाल्या त्या निवडीवर शिवसेना सातारा जिल्हा व महाबळेश्वर तालुका यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. 

शिवसेना बाळासाहेब भवन मुंबई या ठिकाणी शिवसेना सातारा जिल्हा शिवसेना महाबळेश्वर तालुका शिवसेना वाई तालुका आणि शिवसेना खंडाळा तालुका या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या निवडी संदर्भात विचारणा केली असता. वरिष्ठ पातळीवर खोटी माहिती सांगण्यात आली आणि ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर दुसरी कुठलीही नियुक्ती करण्यात आली नाही व तालुकाप्रमुख संजय शेलार यांना काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे,व त्यांचे पद कायम ठेवण्यात आले आहे शिवसेना सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना आश्वासित करण्यात आलं. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका होईपर्यंत कोणत्याही नियुक्त्या केल्या जाणार नाहीत. अशा कोणत्याही नियुक्ती शिवसेना सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी गृहीत धरू नये कारण संजय शेलार यांचे पद कायम ठेवण्यात आलेलं आहे.