Newsprahar

यवत पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांचा भोंगळ कारभार गुन्हेगारांना सूट अवैद्य धंदेवाल्यांना अभय…

यवत पोलीस स्टेशन हद्दीत महिन्याला लाखोंची उलाढाल..! याकडे पुणे पोलीस अधीक्षक लक्ष देतील का?

NEWS PRAHAR( सुचिता भोसले ) ( पुणे ) :जिल्ह्यातील अवैध धंद्यांना तात्काळ आवर घाला सध्या पोलीस दलाकडून सुरू असलेले कामकाज समाधानकारक नसल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी अवैध धंदे रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात असा आदेश देऊन कारवाई न झाल्यास संबंधित ठाणे प्रभारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. असा इशारा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला आहे. राज्यातील 10 ते 15 दिवसातील घटना पाहता पोलीस दल ॲक्शन मोडवर आले आहे.

 परंतु यवत पोलिस स्टेशनचे निरीक्षक स्वत:च्या पदाचा गैर वापर करत असल्याचे समोर आले आहे. या वरिष्ठ पोलिस निरिक्षकाच्या कार्यकाळात यवत पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ४४७/२०२४ भा.द.वि. कलम ३४५,३५४ब,५०४,५०६,५०९ असा गुन्हा मागील वर्षी यवत पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अजिंक्य दौंडकर यांनी केला होता. 

परंतु सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दौंडकर यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या सांगण्यावरून चार शीट कोर्टामध्ये दाखल केली पण गुन्ह्याच्या योग्य तपासा बाबत चार शीट नसल्यामुळे अजिक्यं दौंडकर याला निलंबित करण्यात आले. सदर चार शिट मधील भूमिका व तपासामधिल उणिवा बाबत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या सह्या होत्या ह्यांना ही निलंबित करण्यात यायला हव होत,परंतु त्यांना निलंबित केल नाही.

सदर तपासा बाबत माननीय उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सदर गुन्ह्याच्या त्रुटी बाबत मा. अप्पर मुख्य सचिव ( गृह )म. रा. मुंबई यांना स्वतः हजर राहून प्रतिज्ञापत्र सादर करावे लागले होते. या प्रकरणात पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी पोलीस हवालदार अजिंक्य दौंडकर यांना शासकीय सेवेतून निलंबित केले होते. जर या प्रकरणात चार शिटवर पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या साह्या असताना ही त्यांच्यावर पोलीस अधीक्षकांनी काहीच कारवाई केली नाही. 

या प्रकरणात न्यायालयात मा. अप्पर मुख्य सचिव गृह महाराष्ट्र राज्य यांना स्वतः हजार होवून प्रतिज्ञापत्र सादर करावे लागले होते. एवढी गृह खात्याची नाचक्की होऊनही फक्त पोलीस हवालदार अजिंक्य दौंडकर यांचा नाहक बळी देण्यात आला व पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना का वाचवण्यात आले असा प्रश्नही नागरीकांना पडलेल आहे. 

जर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख साहेब कडक शिस्तीचे अधिकारी आहेत तर त्यांनी फक्त कर्मचाऱ्यावरच कारवाई का केली.त्यांनी पोलीस वरिष्ठ निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर कार्यवाही करणे गरजेचे होते. एवढच नाही तर पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे यवत पोलीस स्टेशनला आल्यापासून त्यांची वागणूक सर्वसामान्य जनतेशी व्यवस्थित नाही. नागरीकांना मोठ्याने ओरडून बोलणे दहशत निर्माण करणे अशा वागणूकीची चर्चा नागरीकांमध्ये आहे. व अवैध धंदे वाल्यांना पाठीशी घालत असल्याची सध्याची वस्तुस्थिती आहे.

पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे आणि पोलीस प्रशासन कारवाई करण्याऐवजी ‘हप्ता वसूल‘ करण्यात मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


अवैध गावठी दारू, गांजा ,क्लब, लॅाज मधील वेश्याव्यवसाय ,मटका,भंगाराची दुकाने ,दारू भट्या, तमाशा थिएटर ,गुटखा विक्रेते,वाळू उपसा व वाळू वाहतूक यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा नाहक त्रास होत आहे, मात्र संबंधित व्यावसायिक व पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत तक्रार करायची कोठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

परवाने नसताना मद्यविक्री…

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना अनेक हॉटेल व्यावसायिक मद्यविक्री करत आहेत. अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे वेगळे हप्ते असल्याचे हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत.”सामान्य नागरिक, महिला यांना या अवैध धंद्यांचा अफाट त्रास होत आहे. अल्पवयीन मुलांमध्येही नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. कौटुंबीक वाद होत आहेत. पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे.