Newsprahar

मोठी बातमी ! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?ज्येष्ठ नेत्यांने सगळंच सांगितलं..

NEWS PRAHAR : उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनी ‘महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते मी करेन’ असे ठणकावून सांगत राज ठाकरेंसोबत युती करण्यास सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. यावरुन महापालिका निवडणुकांआधी शिवसेना पुन्हा अखंडित होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, विभाजनामुळे शिवसेना पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत. दोन दोन वर्धापन दिवस साजरे होतात, दोन दसरा मिळावे साजरे होतात. दोन्हींची ताकद एकत्र आली तर केवढी मोठी ताकद शिवसेनेची महाराष्ट्रात तयार होईल. आजही वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात, त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन असे ते म्हणाले.
 

पुढे बोलताना किर्तीकर म्हणाले की, मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशीही याबाबत बोलेन. मला वाटते की ते माझ्या वयाचा आणि अनुभवाचा ते मान राखतील. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाकडे पाठ केली, तसं करायला नको होतं. आज ज्या लाखो शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांचे विचार भिनले आहे. तो विचार न घेता त्यांनी हिंदुत्वाकडे पाठ केली.

 

एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. महाराष्ट्रात भाजपनंतर शिवसेना ही दुसरी सर्वात मोठी राजकीय शक्ती आहे. एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. त्याचे पडसाद येत्या महापालिका निवडणुकीत दिसतील, असे किर्तीकर म्हणाले.