Newsprahar

महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू…!!

NEWS PRAHAR : प्रयागराज –  हाकुंभात आज सकाळी झालेल्याझालेल्या चेंगराचेंगरीबाबत उत्तर प्रदेश सरकारचे पहिले अधिकृत विधान आले आहे.या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून 19 जखमी रुग्णालयात दाखल आहेत, अशी माहिती  डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिली आहे.

कृष्णा म्हणाले की, मृत्यू झालेल्यांमध्ये 25 लोकांची ओळख पटली आहे, गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यांतील भाविकांचा मृतांमध्ये समावेश आहे. अपघातानंतर 90 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी सध्या गंभीर जखमी असलेले 19 जण उपचार घेत आहेत, उर्वरित सर्वांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान,  सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. आज संध्याकाळपर्यंत 5 कोटींहून अधिक लोकांनी अमृत स्नान केल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय 13 जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे 25 कोटी लोकांनी महाकुंभात श्रद्धेने स्नान केले आहे.