Newsprahar

मनोरमा खेडकर यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी…

NEWS PRAHAR : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना आज पोलिसांनी अटक केली. मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने २० जुलैपर्यंत (३ दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

मनोरमा खेडकरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी महाड मधून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना पौड पोलीस स्टेशनमध्ये आणलं. तसेच पौड ग्रामीण रुग्णालयात मेडीकलसाठी नेण्यात आलं. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.