न्यूज प्रहार ( मुंबई ) : 72 किलो गांजा अमली पदार्थ वाहतूक करत असल्याच्या आरोपातून बॉम्बे हायकोर्टातून आरोपीस जामीन मंजूर झाला.पुणे येथील अमली पदार्थ पथकांनी 2021 या वर्षी लोणीकंद येथे खाजगी वाहनातून सुमारे 72 किलो गांजा पकडण्यात आला होता .
त्यामध्ये या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली होती . पुणे कोर्टाने आरोपीचा दोन वेळा जामीन नामंजूर करत तो अर्ज फेटाळला होता . आरोपीच्या वतीने पुणे येथील सुप्रसिद्ध लॉफर्म अग्रवाल लीगल सोल्युशन्स चे संस्थापक व नामांकित वकील मा.सिद्धार्थ अग्रवाल यांनी कोर्टामध्ये जोरदार आरोपीच्या वतीने युतीवाद करत आपल्या धैयपूर्ण कौशल्याने मुंबई हायकोर्टामध्ये पृथ्वीराज चव्हाण कोर्ट समोर आरोपीची बाजू मांडत त्यास NDPS आमली पदार्थच्या आरोपातून जबरदस्त युतीवाद करत जामीन मिळवून दिला .
ॲड सिद्धार्थ अग्रवाल यांनी आत्तापर्यंत अनेक लोकांना त्यांच्या कार्यशीलीतून जामीन मिळवून दिलेले आहेत .तसेच ते गोरगरीब लोकांना देखील खूप मदत करतात .अनेक वेळेस तर असे झालेले आहे की ,एखाद्याला वकिली फी देणे शक्य नसल्यामुळे त्याची केस घेण्यास नकार देतात ,पण अशा व्यक्तींचे देखील सिद्धार्थ अग्रवाल फी न घेता त्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. त्यांना न्याय मिळवून देतात सत्याची बाजू ते अनेकदा कोर्टात ठामपणे मांडतात. त्यांच्या या कामाच्या शैलीमुळे त्यांच्या वकिली पेशात त्यांना मानणारा एक वर्ग तयार होत आहे.