NEWS PRAHAR ( पुणे ) : बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची उच्च न्यायालयाने ‘सुओ मोटो’ दखल घ्यावी, अशी मागणी फरहा चॅरिटेबल फाउंडेशनने केली. याबाबतचे पत्रक फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष फरहा शेख यांनी प्रसिद्ध केले आहे.
न्यायालयाने तपास आणि खटल्याचे निरीक्षण करावे, राज्य सरकारला त्वरित मदत करण्याचे निर्देश द्यावेत, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. तसेच, राज्य सरकारने या घटनेचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, शाळेची नोंदणी रद्द करावी, शाळेतील सुरक्षितता प्रोटोकॉल सुधारावेत, हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करावा, अशा मागण्याही फाउंडेशनने केल्या आहेत.