Newsprahar

बंदी असूनही नारायणगाव, आळेफाटा ,जुन्नर व वेल्हे येथे गुटखा विक्री सर्रास सुरूच…

जुन्नर येथील सलीम शेख नारायनगाव आळेफाटा येथील बाबाजी वाजे या गुटखा किंग विक्रेत्यांवर कारवाई का होत नाही ?

न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : ग्रामीण परिसरातील प्रत्येक गावात व खेड्यात किराणा दुकान, पानठेला इत्यादी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या विक्रीसाठी लटकवलेल्या आढळून येत आहेत. कोणाचीही भीती न बाळगता गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. होलसेल गुटका विक्रेते हे सर्व खेड्यात व गावात प्रत्येक दुकानावर गुटख्याचा माल मोटारसायकलवरून पोहोचून देण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे.

मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नसल्याचे चित्र आळेफाटा व जुन्नर येथे पहावयास मिळत आहे. महिला, पुरुष तथा शालेय विद्यार्थीसुद्धा मोठ्या प्रमाणात या गुटख्याच्या आहारी गेले आहेत. कर्करोगाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने धाडसी निर्णय घेत राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला होता. कठोर अंमलबजावणीसाठी कायदासुद्धा निर्माण केला आहे; परंतु अन्न व औषध प्रशासन विभाग आणि आळेफाटा व जुन्नर पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे सध्या दिसत आहे.

यांच्या दुर्लक्षामुळे गुटखा विक्री जोमात सुरू आहे. कारवाईत गुटख्याच्या पुड्या जप्त करण्यात आल्याचे दिसत असले तरी थातूरमातूर कारवाईनंतर पुन्हा गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष होत आहे. गुटखा सप्लायर करणाऱ्या, बाबाजी वाजे या गुटखा किंग वर योग्य कारवाई व्हावी अशी नागरीकांची मागणी आहे.

केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई का केली जाते असे स्थानिक नागरीकांनी न्युज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

गत महिन्यात आळेफाटा जुन्नर येथील पानटपऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र होलसेल विक्रेते मात्र मोकाटच असून लाखो, करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. सर्व अवैद्य धंदे बंद करा असा आदेश असताना सुद्धा नारायणगाव, आळेफाटा ,जुन्नर व वेल्हे येथिल गुटखा विक्रेत्यांनी पुणे SP साहेबांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट दिसत आहे. या बातमी नंतर गुटखा होलसेल सप्लाय करणाऱ्यावर पुणे ग्रामिणचे अधिक्षक काय कारवाई करतील ? याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.