बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करून बारामतीहून पुण्याकडे निघालेल्या वसूली अधिकाऱ्याचा खुन करणारे अज्ञात आरोपीस चोवीस तासांचे आत केले गजाआड- स्थानिक गुन्हे शाखा, व दौंड पोलीस स्टेशन
पुणे ग्रामीण पोलीसांची कामगिरी.
न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : दि. ०१/०३/२०२४ रोजी इसम नामे प्रवीण नारायण मळेकर वय ५४ वर्षे रा. पुणे हे बँक ऑफ महराष्ट्र शाखेतील रिकव्हरी नोटीस घेवून बारामती विभागात वाटप करणेसाठी आलेले होते. नोटीस वाटप केले नंतर रात्रौ २०/०० दरम्यान ते त्यांचेकडील मोटार सायकल वरून बारामती-पाटस रोडने पुण्याकडे जात असताना वासुंदे गावचे अलीकडे त्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने तलवारी सारखे दोन्ही बाजूने धारदार असलेले लोखंडी हत्याराने पोटात खूपसून त्यांचा खून केला आहे.
वगैरे मा चे फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं. १६४/२०२४ भा.दं.वि.का.क. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा होता. मा. श्री पंकज देशमुख साो., पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव साो. बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री स्वप्निल जाधव दौंड विभाग, दौंड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या. स्था.गु.शा. चे पथक व दौंड पोलीस स्टेशनकडील तीन पथके तयार करून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. यातील मयत इसम प्रवीण मळेकर हे बारामती पाटस रोडवरील वासुंदे गावातील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोरील रोडवर मोटार सायकलसह खाली पडले होते, तेव्हा त्यांचे पोटात तलवारी सारखे दिसणारे लोखंडी हत्यार खुपसलेले हाते.
त्यांना रोडने येताना रंजनाबाई मच्छिद्र लोंढे स्मृती स्थळासमोर हत्याराने मारलेले असल्याचे समजले. तपासा
दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, स्मृती ठिकाणाचे जवळ राहणारा दिपक रामदास लोंढे याने त्याचेकडील दोन्ही बाजूस धारदार असलेल्या लोखंडी हत्याराने मारून सदरचा खुन केला आहे. अशी बातमी मिळाल्याने इसम नामे दिपक रामदास लोंढे वय ३७ वर्षे रा. वासुंदे, रंजनाबाई मच्छिद्र लोंढे स्मृतीस्थळाजवळ ता. दौंड, जि पुणे यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने खुनाचा गुन्हा केल्याचे सांगितले. आरोपीने त्याचेकडील लोखंडी दोनधारी हत्यार हे प्रवीण मळेकर यांचे पोटात खूपसले व प्रवीण मळेकर हे तेथून मोटार सायकलवर त्या परीस्थीतीत पुढे येवून पेट्रोल पंपासमोर खाली पडले.
सदरचे खुन करण्यासाठी वापरणेत आलेले हत्यार हस्तगत करणेत आलेले आहे. आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता आरोपीची न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर करणेत आली आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री श्रीकांत पांडुळे, भोर विभाग, सासवड यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस स्टेशनचे पो.नि. चंद्रशेखर यादव, सपोनि अरविंद गटकुळ, सपोनि तुकाराम राठोड, स्था.गु.शा. कडील, सपोनि राहूल गावडे, पोलीस अंमलदार असिफ शेख, सुभाष राउत, श्रीरंग शिंदे, मंगेश थिगळे, विजय कांचन, महेश भोसले, काशिनाथ राजापूरे, शरद वारे, किरण पांढरे, नितीन बोऱ्हाडे, पांडुरंग थोरात, धिरज जाधव, अमिर शेख, विशाल जावळे, संजय नगरे, सागर म्हेत्रे, योगेश गोलांडे, रविंद्र काळे यांनी केली आहे.